टीम इंडियाचा महान क्रिकेटर विनू मांकड, श्रीलंकेचा माजी फलंदाज कुमार संगकारा आणि झिम्बाब्वेचा माजी कर्णधार अँडी फ्लॉवर यांच्यासह दहा दिग्गजांना आयसीसी हॉल ऑफ फेममध्ये (ICC Hall Of Fame) स्थान देण्यात आले आहे. भारतीय क्रिकेटसाठी दिलेल्या मोलाच्या योगदानाबद्दल विनू मांकड यांना ICC ने सर्वोत्तम क्रिकेटपटूंच्या यादीत स्थान दिले आहे.  मांकडने ४४ कसोटी सामने खेळले. यात मानकडने ३१.४७ च्या सरासरीने २,१०९ धावा केल्या. तर ४४ कसोटी सामन्यांमध्ये ३२.३२ च्या सरासरीने १६२ बळी घेतले. मांकडची गणना भारताच्या महान अष्टपैलू खेळाडूंमध्ये केली जाते.

श्रीलंकेकडून संगकाराने १४४ कसोटी सामने खेळले असून त्यामध्ये त्याने ५७.४० च्या सरासरीने १२,४०० धावा केल्या. या मध्ये त्याने ३८ शतके आणि ५२ अर्धशतके केली आहेत. याशिवाय त्याने १८२ कॅच घेतले आणि २० स्टंपिंग्स केले. संगकाराच्या नेतृत्वात श्रीलंकेने २०११ च्या विश्वचषक स्पर्धेच्या अंतिम सामन्यात प्रवेश केला होता, जरी त्या संघाला भारताकडून पराभवाला सामोरे जावे लागले. संगकारा एक उत्तम फलंदाज तसेच एक महान यष्टीरक्षक होता.

Story img Loader