संपूर्ण भारतात श्रीकृष्ण जन्मोत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. सर्वसामान्य जनतेपासून ते सेलिब्रिटींपर्यंत सगळ्यांनी हा उत्सव साजरा केला. याच दरम्यान क्रिकेटपासून सध्या दूर असलेला टीम इंडियाचा माजी कर्णधार कॅप्टन कूल धोनी याचा एक व्हिडीओ चांगलाच व्हायरल झाला आहे. धोनीचा हा व्हिडीओ जुना आहे, पण तो कृष्णजन्मोत्सवाच्या औचित्याने व्हायरल झाला आहे.
धोनी तल्लीन होऊन हातात पकडलेली बासरी वाजवताना दिसत आहे. धोनीचा बासरी वाजवतानाचा व्हिडीओ सात सेकंदांचा आहे. या व्हिडीओ सोशल मीडियावर झटपट व्हायरल होत आहे. एखाद्या उत्तम बासरीवादका प्रमाणे धोनीने हातात बासरी धरली आहे. त्याचा हा नवा अंदाज चाहत्यांना चांगलाच भावला आहे. बासरी वाजवताना धोनीने डोळ्यावर काळा चश्मा घातला आहे.
Happy janmashtami to all MSdians around the world
How Many Retweets for our krishna pic.twitter.com/WCVHCvBUsq— TEAM MS DHONI #Dhoni (@imDhoni_fc) August 23, 2019
धोनीचा बासरी वाजवणारा हा व्हिडीओ जुना आहे. या व्हिडीओमध्ये त्याच्या पाठीमागे अंबाती रायूडू देखील दिसतो आहे. तसेच धोनीने टीम इंडियाचा जुना टी शर्ट घातला आहे. या व्हिडीओ धोनीच्या एका फॅन पेजने ट्विट केला आहे. या ट्विटमध्ये त्यांनी धोनीच्या जगभरातील चाहत्यांना कृष्ण जन्मोत्सवाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.