IND vs SA 2nd ODI Highlight: सहसा आपण बॉलिवूड कलाकारांच्या बाबत हे पाहिले असेल की समजा एखाद्याची मुलाखत सुरु असेल आणि कुठल्या दुसऱ्याचा कलाकाराच्या चाहत्याने त्यांना काही प्रश्न केला किंवा इतरांचे कौतुक केले तर त्या सेलिब्रिटीचा पारा चढतो. क्रिकेटमध्ये मात्र अशी भांडणे होत नाहीत असं आम्ही नाही तर आता स्वतः ईशान किशनच्या एका कृतीमुळे अशा चर्चा रंगत आहेत.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

रांची येथील दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात इशान किशनचे पहिले आंतरराष्ट्रीय शतक सात धावांनी हुकले. तरी आपल्या षटकारांच्या पराक्रमाने चाहत्यांची वाहवा मिळवली होती. बीसीसीआयने पोस्ट केलेल्या व्हिडिओमध्ये, सामन्यानंतर ईशानच्या अवतीभोवती रांचीमधील चाहत्यांनी गर्दी केलेली दिसत आहेत. विशेष म्हणजे या गर्दीत एका चाहत्याने ईशानला भेटून चक्क शार्दूल ठाकूरसाठी भेट पाठवली आहे. शार्दूल ठाकूरच्या चाहत्याने ईशानकडे एक खास चिठ्ठी देत ती शार्दूल पर्यंत पोहोचवण्याची विनंती करताच ईशानने केलेल्या कृतीचे सगळ्यांकडूनच कौतुक होत आहे.

खरंतर रांची हे ईशानचे घरचे मैदान आहे, त्यामुळे इथे त्याचे चाहते असणारच पण रांचीमधील चाहते फक्त माझ्यावर प्रेम करत नाहीत, तर इतरांवरही प्रेम आहे असे ईशानने सांगितले. एका चाहत्याने त्याला शार्दुल ठाकूर 54 आणि एक हार्ट ईमोजी असं लिहून एक चिठ्ठी दिली होती. त्या चाहत्याने अगदी तळमळीने ईशानला चिठ्ठी देताना शार्दूलपर्यंत ती पोहोचवण्याची विनंती केली आणि त्यावेळी ईशानने चिठ्ठी घेऊन “मी नक्की देईन आणि सांगेन की एका तगड्या फॅनने हे दिले आहे” असे उत्तर दिले. दरम्यान सांगितल्याप्रमाणे ईशानने शार्दुलला भेट दिल्यावर त्यानेही त्या खास चिठ्ठीसह फोटो काढला आहे.

पहा व्हिडीओ

Video: टीम इंडियावर कपिल देव भडकले, म्हणाले “मला डिप्रेशन कळत नाही, तुम्हाला जमत नसेल तर IPL..”

दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या एकदिवसीय मालिकेत तिसऱ्या क्रमांकावर खेळत असलेल्या इशानने ८४ चेंडूत ९३ धावा करून भारताच्या २७९ धावांची मोठे योगदान दिले. किशनने सात षटकार ठोकले होते जे पाहायला गेल्यास संपूर्ण दक्षिण आफ्रिका संघापेक्षा अधिक होते. शतकाच्या अगदी सात धावा कमी असताना डीप मिड-विकेटवर किशन आऊट झाला होता.