KL Rahul missing a chance to run out Marnus Labuschenne Video Viral: भारत आणि ऑस्ट्रेलिया संघांतील तीन एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेला शुक्रवारी झाली आहे. या मालिकेतील पहिला सामना मोहाली येथे खेळला जात आहे. या सामन्यात टीम इंडियाने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आणि ऑस्ट्रेलिया फलंदाजीसाठी निमंत्रित केले. प्रथम गोलंदाजी करणाऱ्या भारतीय संघाकडून खराब क्षेत्ररक्षण पाहिला मिळाले. त्यापैकी कर्णधार केएल राहुलचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.
भारताने मार्नस लाबुशेनला धावबाद करण्याची सोपी संधी गमावली. लाबुशेन धावबाद होताना थोडक्यात बचावला. शॉट खेळल्यानंतर लाबुशेन धाव काढण्यासाठी धावला, पण कॅमेरून ग्रीन तयार नव्हता आणि त्याने नकार दिला. त्यानंतर सूर्यकुमार यादवने धावबादसाठी केएल राहुलकडे थ्रो केला, पण केएल राहुलला थ्रो पकडता आला नाही आणि मार्नस लाबुशेन धावबाद होण्यापासून बचावला. यानंतर आता केएल राहुलचा व्हिडीओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. त्याचबरोबर चाहते केएल राहुलला ट्रोल करत आहेत.
ऑस्ट्रेलियाने गमावली तिसरी विकेट –
११२ धावांवर ऑस्ट्रेलियाची तिसरी विकेट पडली. स्टीव्ह स्मिथ ६० चेंडूत ४१ धावा करून बाद झाला. त्याने आपल्या खेळीत तीन चौकार आणि एक षटकार मारला. मोहम्मद शमीने त्याला क्लीन बोल्ड केले. आता कॅमेरुन ग्रीन मार्नस लाबुशेनसह क्रीजवर आहे. २२ षटकांनंतर ऑस्ट्रेलियाची धावसंख्या ११४/३ आहे.
ऑस्ट्रेलियाविरुद्ध भारताचा रेकॉर्ड चांगला नाही –
एकदिवसीय क्रिकेटमध्ये भारतीय संघाचा ऑस्ट्रेलियाविरुद्धचा विक्रम चांगला नाही. दोन्ही संघांमध्ये एकूण १४६ सामने झाले आहेत, त्यापैकी भारताने ५४ आणि ऑस्ट्रेलियाने ८२ जिंकले आहेत. त्याच वेळी, १० सामने अनिर्णित राहिले. भारतीय भूमीवर दोन्ही संघांमध्ये ६७ वनडे सामने झाले आहेत. भारताने ३० सामने जिंकले असून ऑस्ट्रेलियाने ३२ सामने जिंकले आहेत. त्याचवेळी पाच सामने अनिर्णित राहिले. मोहालीच्या मैदानावर दोन्ही संघ पाच वेळा आमनेसामने आले असून ऑस्ट्रेलियाने चार वेळा विजय मिळवला आहे, तर भारताने केवळ एकच सामना जिंकला आहे. या सामन्यात टीम इंडियाला आकडे सुधारण्याची संधी आहे.