Mahendra Singh Dhoni Benefiting Candy Crush Game Company: माजी भारतीय क्रिकेटपटू एमएस धोनीचा विमानातील एक व्हिडीओ व्हायरल झाला होता. या व्हायरल व्हिडीओमुळे एका गेम कंपनीला फायदा झाला आहे. माहीचा विमानातील व्हिडीओ व्हायरल झाला होता, ज्यामध्ये तो कँडी क्रश गेम खेळताना दिसत होता. यानंतर कँडी क्रश गेम कंपनीने मोठा नफा कमावला आहे. हा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर तीन तासांत ३६ लाख लोकांनी त्यांच्या फोनवर ही व्हिडीओ गेम डाउनलोड केली.

एका ट्विटमध्ये कँडी क्रश टीमचा हवाला देत हा दावा केला आहे. कँडी क्रश गेमने बी यांनी ट्विट करून आनंद व्यक्त केला आहे. कँडी क्रशच्या अधिकृत ट्विटर अकाऊंटवर ३६ लाख लोकांनी व्हिडिओ गेम डाऊनलोड केल्याचे सांगितले नसले, तरी धोनीने हा गेम खेळल्याबद्दल आनंद व्यक्त करण्यात आला आहे.

helium leaks discovered on boeings starliner
विश्लेषण :अंतराळयानामध्ये हेलियमचा वापर का केला जातो? बोईंग स्टारलाइनरचा पेच हेलियम गळतीमुळे?
What Sharad Pawar Said About Ladki Bahin Yojana
Sharad Pawar : “लाडकी बहीण योजनेमुळे महायुतीचं राज्य…
Karan Aujla live show video
भर कॉन्सर्टमध्ये चाहत्याने फेकून मारला बूट, ‘तौबा तौबा’ फेम गायकानं केलं ओपन चॅलेंज, पाहा Video
Punjab Viral Video
Punjab Viral Video : धक्कादायक! फोनसाठी चोरट्यांनी तरुणीला नेलं फरफटत, घटनेचा Video व्हायरल
French woman raped 100 times by 50 men
French woman: १० वर्ष, ५० लोक आणि १०० वेळा बलात्कार; पत्नीला अमली पदार्थ देऊन पतीचं क्रूर कृत्य
Hyundai Exter New Variants Launched
Hyundai Exter चे दोन नवे व्हेरिएंटचे लाँच, जाणून घ्या ‘या’ एसयुव्हीचे फीचर्स अन् किंमत
Viral video beating of two people in a moving bus video of incident happening in bhopal shocking video
लालबागनंतर भोपाळमधून संतापजनक प्रकार; चालू बसमध्ये ड्रायव्हरला लाथाबुक्क्यांनी मारलं; थरारक VIDEO समोर
Naveen Ul Haq Teased with Virat Kohli video
Naveen Ul Haq Virat Kohli : विराट कोहलीच्या रील्समुळे नवीन उल हक वैतागला, VIDEO होतोय व्हायरल

एमएस धोनीचा एक व्हिडिओ काही दिवसांपूर्वी व्हायरल झाला होता, ज्यामध्ये एक एअर होस्टेस त्याला फ्लाइटमध्ये चॉकलेट देताना दिसत होती. मात्र, धोनीने कँडी क्रश खेळताना लोकांचे लक्ष वेधून घेतले. यानंतर धोनी आणि कँडी क्रश ट्विटरवर ट्रेंड करू लागले आणि व्हिडीओ गेम कंपनीला याचा फायदा झाला.

हेही वाचा – ODI World Cup 2023: अहमदाबादमध्ये खेळवला जाणार फायनल सामना! ‘या’ १२ शहरांमध्ये रंगणार विश्वचषक स्पर्धेचा थरार

धोनीचा व्हायरल व्हिडीओ –

या व्हायरल व्हिडीओमध्ये, एमएस धोनी आणि त्याची पत्नी साक्षी धोनीसह रविवारी इंडिगोच्या फ्लाइटमध्ये प्रवास करताना दिसला. या दरम्यान क्रिकेटर त्याच्या टॅब्लेटवर कँडी क्रश खेळताना दिसला. व्हिडीओमध्ये, एक एअर होस्टेस चेन्नई सुपर किंग्जच्या कर्णधाराला चॉकलेट, मिठाई तसेच एक नोट सादर करताना दिसत आहे. एअर होस्टेसने दिग्गज क्रिकेटरला मिठाई आणि चॉकलेट देऊ केले तेव्हा त्यांनी ‘ओमानी खजूर’चे पॅकेट घेतले.

व्हिडीओमध्ये एअर होस्टेस धोनीसोबत मैत्रीपूर्ण संभाषण करताना दिसत आहे. धोनी इकॉनॉमी क्लासमध्ये प्रवास करत होता आणि त्याचा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर चाहत्यांनीही त्याच्या साधेपणाचे कौतुक केले. यावेळी चाहत्यांच्या लक्षात आले की धोनी टॅबमध्ये कँडी क्रश गेम खेळत आहे. सोशल मीडियावर हा व्हिडिओ इतका व्हायरल झाला की, ट्विटरवर एमएस धोनीसोबत कँडी क्रश हा हॅशटॅग ट्रेंड होऊ लागला.

कँडी क्रश खेळताना एमएस धोनीचा व्हिडिओ व्हायरल होताच, आणखी एक ट्विट समोर आले, जे चर्चेत आहे. हे ट्विट द डगआऊट या नावाच्या हँडलवरुन करण्यात आले आहे, ज्यामध्ये लिहिले आहे की, “आम्हाला फक्त ३ तासात ३.६ दशलक्ष नवीन डाउनलोड मिळाले आहेत. भारतीय क्रिकेटचा महान खेळाडू धोनीला धन्यवाद. आम्ही फक्त तुमच्यामुळे भारतात ट्रेंड करत आहोत.” परंतु, हे ट्विटर खाते अधिकृत कँडी क्रश खाते नाही.

त्यानंतर कँडी क्रश सागाच्या अधिकृत अकाऊंटवरून याप्रकरणी दोन ट्विट करण्यात आले आहेत. पहिल्या ट्विटमध्ये धोनी आणि इतर यूजर्सबद्दल आदर व्यक्त करण्यात आला आहे आणि दुसऱ्या ट्विटमध्ये धोनीने हा खेळ खेळल्याबद्दल आनंद व्यक्त केला आहे.

हेही वाचा – ODI World Cup 2023: केन विल्यमसनने दुखापतीनंतरही मानली नाही हार, विश्वचषक स्पर्धेची करतोय तयारी, पाहा VIDEO

धोनीला व्हिडीओ गेम्स खेळण्याचा शौक आहे. त्याला त्याच्या मित्रांसोबत फिफा, कॉल ऑफ ड्यूटी आणि पब्जीसारखे गेम खेळायला आवडतात. भारतीय वेगवान गोलंदाज इशांत शर्माने अलीकडेच यूट्यूबवरील द रणवीर शोच्या एका एपिसोडमध्ये सांगितले की, “आम्ही सर्वजण जिथे जातो तिथे प्लेस्टेशन सोबत घेऊन जातो. माही भाईला कॉल ऑफ ड्यूटी सारखे ऑनलाइन व्हिडीओ गेम खेळायला आवडते आणि त्याला पब्जी खूप आवडते.”