Rohit Sharma Angry on Shubman Gill Video Viral: आशिया कपच्या फायनलमध्ये भारत आणि श्रीलंका हे संघ भिडणार आहेत. या दोन्ही संघांतील हा फायनल सामना कोलंबोतील आर प्रेमदासा स्टेडियमवर खेळला जाणार आहे. या सामन्याला भारतीय वेळेनुसार दुपारी ३ वाजता सुरुवात होणार आहे. तत्पूर्वी या सामन्यापूर्वी सोशल मीडियावर एक व्हिडीओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.

सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या व्हिडीओमध्ये भारतीय संघाचा कर्णधार रोहित शर्मा आणि शुबमन गिल दिसत आहेत. खरंतर रोहित शर्मा आणि शुबमन गिल बोलत होते. यादरम्यान शुबमन गिलने रोहित शर्माला काहीतरी सांगितले, जे कदाचित भारतीय कर्णधाराला आवडले नसेल. यावर उत्तर देताना रोहित शर्मा म्हणाला की, ‘मी हे करू शकत नाही,, तू वेडा आहेस का?’

PM Narendra Modi Speech
PM Narendra Modi : नरेंद्र मोदींचं वक्तव्य; “आपल्या देशातल्या एका पंतप्रधानांना मिस्टर क्लिन म्हटलं जायचं, तेच म्हणाले होते…”
mh370 search operation malaysian airlines
Malasian Airlines: बेपत्ता MH370 चा शोध; पुण्यातील प्रल्हाद…
Abhishek Sharma Highest T20I Score for India 135 Runs Breaks Many Records IND vs ENG 5th T20I
IND vs ENG: अभिषेक शर्माने घडवला इतिहास, टी-२० मध्ये कोणत्याच भारतीय फलंदाजाला जमलं नाही ते करून दाखवलं
Rohit Sharma Viral Video of BCCI Awards on Smriti mandhana Question
VIDEO: “माझी बायको बघत असेल…”, विसरभोळ्या रोहित शर्माचं स्मृती मानधनाच्या प्रश्नावर भलतंच उत्तर; नेमकं काय घडलं?
Ashneer Grover Viral Video
Viral Video : “नाम नहीं जानता, तो बुलाया क्यों…”, ‘शार्क टँक’ फेम अशनीर ग्रोव्हरचे सलमान खानला प्रत्युत्तर; येथे पाहा Video
Kevin Pietersen praises Harshit Rana bowling as a connection substitute during IND vs ENG 4th T20I at Pune
Harshit Rana : “त्याची चूक नाही…”, इंग्लंडच्या माजी कर्णधाराचे कनक्शन सब्स्टिट्यूट वादात हर्षित राणाच्या समर्थनार्थ वक्तव्य
Abhijeet Chavan
“मेल्या, चप्पल तरी काढ”, नेटकऱ्याच्या कमेंटवर अभिजीत चव्हाण यांची प्रतिक्रिया; म्हणाले, “तीच तर…”
Shubman Gill Throws Bat in Anger After Controversial Dismissal in Ranji Trophy
Ranji Trophy: शुबमन गिल वादग्रस्तरित्या बाद झाल्यानंतर संतापला, हवेत फेकली बॅट अन् डोक्याला…, VIDEO व्हायरल

रोहित शर्मा आणि शुबमन गिलचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल –

मात्र, रोहित शर्मा आणि शुबमन गिल यांच्या संभाषणाचा व्हिडीओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. याशिवाय शुबमन गिल असं का बोलला, ज्यामुळे रोहित शर्मा इतका संतप्त झाला? यावर चाहते आता अंदाज लावत आहेत. सोशल मीडिया यूजर्स सतत कमेंट करून आपली प्रतिक्रिया देत आहेत.

हेही वाचा – Diamond League : नीरज चोप्राला विजेतेपदाची हुलकावणी, अवघ्या काही सेंटीमीटरने हुकलं जेतेपद

आशिया चषक फायनलमध्ये रोहित आणि शुबमनवर असणार सर्वांची नजर –

त्याचवेळी आज रोहित शर्मा आणि शुबमन गिल आशिया कप फायनलमध्ये मैदानात दिसणार आहेत. भारत आणि श्रीलंका यांच्यातील विजेतेपदाचा सामना कोलंबोमध्ये भारतीय वेळेनुसार दुपारी ३ वाजता सुरू होईल. रोहित शर्माच्या नेतृत्वाखालील भारतीय संघाने सुपर फोर फेरीत पाकिस्तान आणि श्रीलंकेचा पराभव केला. तर बांगलादेशविरुद्ध पराभवाचा सामना करावा लागला. श्रीलंकेबद्दल बोलायचे झाले तर, या संघाने सुपर फोर फेरीत पाकिस्तान आणि बांगलादेशला पराभूत केले, परंतु भारतीय संघाविरुद्ध पराभवाला सामोरे जावे लागले. अशाप्रकारे भारत आणि श्रीलंकेचे संघ प्रत्येकी ४ गुणांसह अंतिम फेरीसाठी पात्र ठरले.

Story img Loader