Sachin Tendulkar Viral Video: रोड सेफ्टी वर्ल्ड सिरीजमध्ये २२ सप्टेंबरला इंडिया लिजेंड्स विरुद्ध इंग्लंड लिजेंड्स असा सामना रंगला होता. यात पुन्हा एकदा मास्टर ब्लास्टर सचिनची बॅट चांगलीच तळपली. तेंडुलकरने फक्त २० चेंडूत ४० धावा करून पुन्हा एकदा सिद्ध केले की निवृत्तीच्या नऊ वर्षानंतरही आजही त्याला क्रिकेटचा देव का म्हंटलं जातं. रोड सेफ्टी वर्ल्ड सिरीजमध्ये इंडिया लीजेंड्ससाठी खेळताना, इंग्लंड लीजेंड्स विरुद्ध सचिन सलामीवीर म्हणून मैदानात उतरला आणि सामना सुरु होताच त्याने धावांचा अक्षरशः मारा सुरु केला.

रोड सेफ्टी वर्ल्ड सिरीजमधील या सामन्यात काल सचिनने लगावलेला एक षटकार सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. सचिनने स्टीफन पॅरीच्या चेंडूवर चौकार मारून खेळाची सुरुवात केली, ख्रिस ट्रेमलेटला एका पाठोपाठ एक षटकार मारण्यापूर्वी त्याने पुन्हा एक चौकार लगावला. सचिनचे षटकार पाहून समालोचकांनीही मास्टर ब्लास्टरवर कौतुकाचा वर्षाव केला. क्रिकेट प्रेमींसाठी हा क्षण खास ठरला कारण बऱ्याच वर्षांनंतर सचिनची तुफान फलंदाजी पाहायला मिळाली, या क्षणाला आणखी सुंदर करत काहींनी या व्हिडिओला दिवंगत क्रिकेटपटू टोनी ग्रेग यांच्यासारखा भासणारा आवाज समालोचन करताना जोडला आहे.

टोनी ग्रेग हे दक्षिण आफ्रिका टेस्ट क्रिकेट संघाचे कर्णधार होते, त्यांच्या समालोचनाची शैलीही फारच अविस्मरणीय होती. २०१२ मध्ये त्यांचे सिडनी, ऑस्ट्रेलियात निधन झाले.

दरम्यान, भारताने काल पहिल्या सहा षटकात ६७ धावा केल्या होत्या ज्यात सचिनच्या तीन षटकारांसह ४० धावा होत्या. यानंतर आता ट्विटरवर #SachinTendulkar ट्रेंड होऊ लागला आहे. काही चाहत्यांनी असेही सुचवले की आगामी टी २० विश्वचषक २०२२ साठी तो भारताचा बॅकअप सलामीवीर असावा.

सचिनचे शॉट पाहून नेटकरी म्हणतात…

दरम्यान, शुक्रवारी नागपुरात होणार्‍या दुसर्‍या टी २० सामन्यात भारताचा ऑस्ट्रेलियाशी सामना कसा होतो हे पाहावे लागेल. येथे पराभव म्हणजे भारतासाठी मालिका गमावणे, जे रोहित शर्माच्या कर्णधारपदाच्या भविष्यासाठी चांगले ठरणार नाही.

Story img Loader