भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात दिल्लीत दुसरा कसोटी सामना खेळला जात आहे. दरम्यान, विराट कोहलीचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. हा व्हिडिओ खाण्याशी संबंधित आहे. जे खाण्याचे शौकीन आहेत ते ही बातमी वाचून आनंदित होतील. विशेष म्हणजे विराट कोहलीला छोले भटुरे खायला खूप आवडतात. विशेषत: प्रसिद्ध रामाचे छोले-भटुरा त्यांच्या जन्मगावी दिल्ली खूप प्रसिद्ध आहेत. टीम इंडिया जेव्हा जेव्हा दिल्लीत येते तेव्हा तेव्हा त्यांची चव नक्कीच घेते आणि विराट कोहली हा मुळचा दिल्लीतील असून त्याचे हे खूप आवडते आहेत.

आता सामना दिल्लीत आहे आणि विराट कोहली छोले भटुरे खायला विसरला, हे कसे होऊ शकते. विराट कोहलीचा एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. ज्यामध्ये तो छोले-भटुरेची ऑर्डर घेताना दिसत आहे. सोशल मीडियावर अनेकांना खात्री आहे की ते छोले भटुरे होते, ज्याला कोहलीने पूर्वी त्याचा आवडता पदार्थ म्हणून वर्णन केले होते. नोव्हेंबर २०१७ मध्ये ‘ब्रेकफास्ट विथ चॅम्पियन्स’च्या एका एपिसोडमध्ये विराट कोहलीने सांगितले होते की त्याला दिल्लीचे छोले भटुरे किती आवडतात.

Karun Nair Smashed 88 Runs Against Maharashtra in Semi Final Vijay Hazare Trophy Innings
Karun Nair: करूण नायरचं विजय हजारे ट्रॉफीमधील वादळ कायम, सेमीफायनलमध्ये महाराष्ट्राच्या गोलंदाजांना दिवसा दाखवले तारे
Pushpak train accident of karnataka express play horn may save life of many passengers
Jalgaon Train Accident : कर्नाटक एक्स्प्रेसच्या चालकाने भोंगा वाजवला…
Virat Kohli knows he is past his best and that will hurt David Lloyd statement after his poor test form
Virat Kohli : ‘विराट कोहलीचा काळ गेला…’, इंग्लंडच्या माजी खेळाडूचं मोठं वक्तव्य; म्हणाला, ‘वयाबरोबर प्रत्येकजण…’
Lakhat Ek Aamcha Dada
Video: ‘लाखात एक आमचा दादा’मध्ये मारामारीच्या सीनचे ‘असे’ झाले शूटिंग; पाहा व्हिडीओ
Kapil Dev Statement on Rohit Sharma Virat Kohli Test Retirement Said They know when to call time
Kapil Dev On Rohit-Virat: “ते दोघं मोठे खेळाडू, त्यांना वाटेल तेव्हा…”, कपिल देव यांचं रोहित-विराटच्या निवृत्तीबाबत मोठं वक्तव्य, नेमकं काय म्हणाले?
Nitish Reddy climbs Tirupati Temple stairs on knees After Stunning Test Debut & Century vs Australia
Nitish Reddy: नितीश रेड्डी गुडघ्यावर चढला तिरूपतीच्या पायऱ्या, ऑस्ट्रेलियातील शतकानंतर देवाचे असे मानले आभार; VIDEO व्हायरल
Yograj Singh coach of Arjun Tendulkar
Yograj Singh: अर्जुन तेंडुलकरनं योगराज सिंग याचं कोचिंग मध्येच का सोडलं? युवराज सिंगच्या वडिलांनी सांगितलं खरं कारण
Virat Kohli Didnt Liked Ambati Rayudu Robin Uthappa Reveals 2019 World Cup Team Selection
Robin Uthappa on Virat Kohli: “विराटला तो आवडत नव्हता”, स्फोटक फलंदाजाला २०१९ च्या वर्ल्डकप संघातून वगळण्याबाबत रॉबिन उथप्पाचा मोठा खुलासा

विराट कोहलीचा व्हिडिओ व्हायरल

व्हिडिओमध्ये विराट कोहली प्रशिक्षक राहुल द्रविडशी बोलताना दिसत होता, तेव्हा एक व्यक्ती त्याला छोले भटुरे घेऊन येते. मग विराटची प्रतिक्रिया लहान मुलासारखी असते. त्याची ऑर्डर पाहून त्याला आनंद होतो. विराटला आनंदी असल्याचे पाहून खुद्द प्रशिक्षक राहुल द्रविडही हसला. एका चाहत्याने हा व्हिडिओ सोशल मीडियावर पोस्ट करताच तो खूप वेगाने व्हायरल झाला आणि चाहत्यांनी त्यावर जोरदार कमेंटही केल्या.

दिल्लीच्या प्रसिद्ध छोले भटुरेबद्दल विराट कोहलीची आवड कोणापासून लपलेली नाही. विराटने अनेक प्रसंगी कबूल केले आहे की त्याला दिल्लीचे छोले भटुरे किती आवडतात आणि जेव्हाही संधी मिळते तेव्हा तो स्वादिष्ट पदार्थ खातो. अशा परिस्थितीत जेव्हा ड्रेसिंग रूममधील स्टाफ मेंबर विराट कोहलीला जेवणाबद्दल सांगतो तेव्हा क्रिकेटरचे डोळे आनंदाने चमकतात. अशा स्थितीत या खाद्यपदार्थाच्या डब्यात काय होणार, असा अंदाज चाहत्यांना लावला जात आहे, जे पाहून विराट कोहली खूप खूश झाला आहे.

हेही वाचा: INDW vs ENGW T20 WC: स्मृतीचे अर्धशतक ठरले व्यर्थ! भारताचा इंग्लंडकडून ११ धावांनी पराभव, सेमीफायनलसाठी करावी लागणार कसरत

भारत-ऑस्ट्रेलिया सामना दोलायमान स्थितीत

भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात दिल्लीत सुरू असलेला दुसरा कसोटी सामना अतिशय रोमांचक वळणावर आला आहे. ऑस्ट्रेलिया आता दुसऱ्या डावात पुढे आहे. ऑस्ट्रेलियाची एकूण आघाडी ६२ धावांपर्यंत वाढली आहे. किमान २५० धावांच्या आता कांगारूंना बाद केलं तरच भारत विजयी होऊ शकतो.

Story img Loader