क्रिकेटच्या मैदानामध्ये विक्रम होतात त्याप्रमाणे अनेकदा गोंधळही उडतो. असाच काहीसा प्रकार घडला १९ वर्षांखालील पाकिस्तान विरुद्ध बांगलादेशदरम्यानच्या कसोटी क्रिकेट सामन्यामध्ये. मुलतानच्या क्रिकेट मैदानावरील या सामन्यामध्ये बांगलादेशच्या खेळाडूंनी पाकिस्तानी फलंदाजाला धावबाद करण्याची सोपी संधी गमावली. विशेष म्हणजे फलंदाजाला धावबाद करण्याच्या नादात विकेटकिपरच दोन धावांइतकं अंतर पळाला. विकेटकीपर वगळता इतर कोणालाही फलंदाजाला बाद करण्यात विशेष रस नव्हता असं चित्र दिसत होतं.

खरं तर हा सारा प्रकार तीन आठवड्यांपूर्वी घडला आहे. मात्र आता या मजेदार प्रसंगाचा व्हिडीओ सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरतोय. या सामन्यातील पहिल्याच दिवशी पाकिस्तानी फलंदाजाने कव्हरला सुंदर फटका लगावला. एक चोरटी धाव घेण्याचा त्याचा प्रयत्न होता. मात्र खेळपट्टीच्या मध्यात आल्यानंतर तो माघारी फिरला. दुसरीकडे नॉनस्ट्राइकर्स एण्डला असलेला फलंदाज बॅटिंग एण्डला पोहोचला. एका क्षणाला दोघेही फलंदाज एकाच बाजूला होते.

यष्ट्यांसमोर हा गोंधळ सुरु असताना यष्ट्यांमागे बांगलादेशचा कर्धणार आणि विकेटकीपर साहीम हुसैन दिपू फलंदाजाला धावबाद करण्यासाठी बरंच अंतर धावून यष्ट्यांजवळ पोहोचला. त्यानंतही तो बॅटींग एण्डवरुन थेट बॉलिंग एण्डला पोहोचला जेव्हा दोन्ही फलंदाज बॅटींग एण्डला होते. मात्र क्षेत्ररक्षण करणाऱ्याने चेंडू बॉलिंग एण्डला फेकण्याऐवजी बॅटींग एण्डला फेकला. त्यामुळे चेंडू पकडण्यासाठी कर्णधार पुन्हा बॉलिंग एण्डकडून बॅटिंग एण्डकडे धावला.

हा सारा गोंधळ पाहून अनेकांना हसू अनावर झाल्याचं पहायला मिळालं. काहींनी विकेटकीपरच दोन धावा धावाला असं म्हटलंय तर काहींनी इतर क्षेत्ररक्षण करणारे खेळाडू काय करत होते असं विचारलं आहे.

१) विकेटकीपर दोन धावा धावला…

२) बाकी लोक काय करतात?

३) कॉलेज क्रिकेट

४) असं झालं म्हणे…

५) निर्धाव चेंडूवर एवढा ड्रामा…

हा व्हिडीओ सध्या तुफान व्हायरल झाला असून चर्चेत आहे.

Story img Loader