Virat and Anushka Daughter Vamika Kohli: भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार विराट कोहलीच्या मुलीवर बलात्कार करण्याची धमकी दिली होती. त्यानंतर धमकी देणाऱ्या व्यक्तीविरुद्ध एफआयआर दाखल करण्यात आली होती. आता ही एफआयआर रद्द करण्याचा निर्णय मुंबई उच्च न्यायालयाने सोमवारी (१० एप्रिल) दिला. न्यायमूर्ती एएस गडकरी आणि पीडी नाईक यांच्या खंडपीठाने कोहलीचे व्यवस्थापक, या प्रकरणातील तक्रारदार यांनी आरोपींवरील आरोप वगळण्यास सहमती दिल्यानंतर हा आदेश दिला.
२०२१ साली, जेव्हा भारतीय संघाला टी-२० विश्वचषकात पहिल्यांदा पाकिस्तानविरुद्ध पराभवाला सामोरे जावे लागले होते, त्यानंतर हैदराबादच्या रामनागेश अकुबथिनीने ट्विट करून कोहलीच्या मुलीवर बलात्कार करण्याची धमकी दिली होती. यानंतर दिल्ली महिला आयोगाने केलेल्या कारवाईवर हैदराबाद पोलिसांनी सॉफ्टवेअर इंजिनिअर रामनागेश अकुबथिनीला अटक केली होती.
अकुबथिनीला नोव्हेंबर २०२१ मध्ये अटक करण्यात आली होती. यानंतर त्यांना कलम ६७बी अंतर्गत कोर्टातून जामीन मिळाला. यानंतर, २०२२ मध्ये, अकुबथिनीने खटला रद्द करण्यासाठी याचिका दाखल केली होती, जी सोमवारी सुनावणीनंतर रद्द करण्यात आली.
मी जेईई रँकधारक आहे, माझा कोणताही गुन्हेगारी इतिहास नाही –
या प्रकरणी आरोपीने न्यायालयात खटला फेटाळण्यासाठी याचिका दाखल केली होती, त्या याचिकेत त्याच्याविरुद्ध कोणताही गुन्हेगारी इतिहास नसल्याचा दाखलाही दिला होता. याशिवाय, जेईई रँकधारक असल्याने, त्याचे भविष्य लक्षात घेण्यास सांगितले होते.
पाकिस्तानने भारताचा एकतर्फी पराभव केला होता –
विराट कोहलीच्या नेतृत्वाखाली २०२१ सालचा टी-२० विश्वचषक खेळण्यासाठी मैदानात उतरला होता. तेव्हा पाकिस्तानविरुद्ध सामना खेळला गेला. या सामन्यात भारताचा एकतर्फी पराभव होईल, अशी कोणीही कल्पना केली नव्हती. या सामन्यात पाकिस्तानने भारताचा १० विकेट्सने एकतर्फी पराभव केला.या कारणामुळे टीम इंडियाला सोशल मीडियावर प्रचंड ट्रोल करण्यात आले.