विराट कोहली हा खूप इगो असलेला फलंदाज आहे. तो फक्त दुबळ्या संघांविरुद्ध धावा करतो अशा प्रकरच्या टीका त्यावर होत होत्या पण आजच्या खेळीने मात्र त्याने या सर्वांना आपल्या बॅटने उत्तर देत गप्प केले आहे. ऑस्ट्रेलियाच्या १८७ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना रोहित शर्मा व लोकेश राहुल स्वस्तात माघारी परतले. पण, विराट कोहली व सूर्यकुमार यादव यांनी तिसऱ्या विकेटसाठी शतकी भागीदारी करून भारताच्या विजयाचा पाया रचला. सूर्यकुमार व विराट या दोघांनी वैयक्तिक अर्धशतक झळकावले आणि त्यानंतर हार्दिक पांड्याने त्याचे काम केले. या सामन्यात विराटने दमदार खेळ करताना भारताचा माजी कर्णधार व सध्याचा मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविड चा विक्रम मोडला.

लोकेश राहुल पहिल्याच षटकात बाद झाला आणि त्यानंतर विराट कोहली फलंदाजीला आला. कोहली फलंदाजीला आल्यावर काही वेळातच रोहित शर्माही १७ धावांवर बाद झाला. त्यावेळी भारतीय संघ अडचणीत सापडला होता. कारण भारताचे दोन्ही सलामीवीर झटपट बाद झाले होते. पण त्यानंतर विराट कोहली खेळपट्टीवर ठामपणे उभा राहीला. त्याने ४८ चेंडूत ६३ धावा केल्या ज्यात ४ षटकार आणि ३ चौकारांचा समावेश होता.

अनेक पत्रकार, समालोचक आणि समाज माध्यमांवर त्याला सतत टीकेला समोरे जावे लागत असे. मात्र तो संयमी होता आणि उत्तर कसे द्यायचे हे त्याला माहिती होते. आजच्या सामन्यात तत्याने दाखवून दिले. लोकेश राहुल आणि रोहित शर्मा यांच्या रुपात दोन धक्के बसले. पण त्यानंतर सूर्यकुमार यादव आणि विराट कोहली यांनी धडाकेबाज फटकेबाजी केली. त्यामुळेच भारताला या सामन्यात सहा गडी राखून विजय मिळवता आली. सूर्याने यावेळी ६९ धावा केल्या, तर कोहलीने ६३ धावांची खेळी साकारली.

Story img Loader