भारताचा स्टार फलंदाज विराट कोहली दीर्घ कालावधीनंतर फॉर्ममध्ये परतला आहे. यावेळी टी-२० वर्ल्ड कपमध्येही त्याने सर्वाधिक धावा करून याचा पुरावा दिला आहे. विराट क्रिकेटसोबतच त्याची पत्नी बॉलीवूड अभिनेत्री अनुष्का (अनुष्का शर्मा) देखील खूप चर्चेत असते. विराट आणि अनुष्काची जोडी देखील जगातील प्रसिद्ध जोडप्यांपैकी एक आहे. आज आपण या दोन्ही स्टार्सच्या सर्वात महागड्या वस्तूबद्दल जाणून घेणार आहोत, ज्यांच्या किंमती ऐकून चकीत व्हाल.

गुरुग्राममधील हवेली –

स्टार खेळाडू विराट कोहली आणि पत्नी अनुष्का यांच्याकडे ८० कोटींचा बंगला आहे. त्यांचा हा बंगला १०००० चौरस मीटरमध्ये पसरलेला आहे. विराटची ही हवेली इतर जगापेक्षा कमी नाही. या बंगल्यात पूल, हाऊस बार आणि इतर गोष्टीही उपलब्ध आहेत. सध्या विराटचे कुटुंब याच हवेलीत राहत आहे. विराटचा हा बंगला दिल्लीच्या सीमेवर असलेल्या गुरुग्रामच्या डीएलएफ फेज १ मध्ये आहे.

PV Sindhu gets emotional seeing Vinod Kambli's video
PV Sindhu: विनोद कांबळीचा ‘तो’ व्हिडीओ पाहून पीव्ही सिंधू झाली भावनिक; पैसे, चांगली माणसं याबाबत केलं मोठं विधान
bjp ravindra chavan
Ravindra Chavan : ‘उपरा’ डोंबिवलीकर ते भाजप प्रदेश…
mantra of happy married life
Video : नात्यांमध्ये इगो बाजूला ठेवा, काका काकूंनी सांगितला सुखी संसाराचा मंत्र, व्हिडीओ पाहून नेटकरी म्हणाले, “ही अरेंज मॅरेजमधील सुंदरता आहे..”
gold jewelry scam with housewife in kurla
बनावट दागिन्यांच्या बदल्यात खरे दागिने घेऊन महिला पसार
Top 10 richest people in India as of January 2025
Top 10 richest people in India : मुकेश अंबानी ते डी मार्टचे संस्थापक…जानेवारी २०२५ पर्यंत ‘हे’ आहेत देशातील टॉप १० सर्वात श्रीमंत व्यक्ती; वाचा यादी
Umesh Kamat
Video: उमेश कामतने घेतली ‘ही’ बाईक; पत्नी प्रिया बापटसह केली पूजा, व्हिडीओ शेअर करत दाखविली पहिली झलक
Marathi actress Shivani sonar and ambar ganpule marry soon
शिवानी सोनार-अंबर गणपुळे लवकरच चढणार बोहल्यावर; लग्नाआधीच्या विधीला झाली सुरुवात, अभिनेत्रीने शेअर केले फोटो
Aishwarya Narkar and Avinash Narkar Romantic dance on chaar kadam Song
Video: ऐश्वर्या-अविनाश नारकरांचा सुशांत सिंह राजपूत आणि अनुष्का शर्माच्या ‘या’ गाण्यावर रोमँटिक डान्स, व्हिडीओ होतोय व्हायरल

अपार्टमेंट फ्लॅट –

विराट आणि अनुष्का हे देखील जगातील प्रसिद्ध जोडप्यांपैकी एक आहे. कोहली आणि अनुष्का यांचा मुंबईतील वरळी येथे एक अपार्टमेंट फ्लॅट आहे. हा फ्लॅट ७००० चौरस मीटरमध्ये पसरलेला आहे. हा फ्लॅट ओंकार १९७३ या उंच इमारतीच्या ३५ व्या मजल्यावर आहे. तसेच विकी कौशल आणि कतरिना कैफही या इमारतीत राहतात. विराट आणि अनुष्काच्या या फ्लॅटची किंमत जवळपास ३४ कोटी आहे.

रोलेक्स कॉस्मोग्राफ डेटोना रेनबो एव्हरबो गोल्ड –

भारतीय खेळाडू विराट कोहलीलाही महागड्या घड्याळांचा शौक आहे. विराटकडे ८.६ लाख रुपयांचे रोलेक्स कॉस्मोग्राफ डेटिना घड्याळही आहे. विराटकडे अशी अनेक महागडी घड्याळे असली तरी. त्यांच्याकडे ४० एमएम केस आहे. घड्याळ कॅलिबर ४१३० आणि ५६ ब्रिलियंट कट डायमंडसह सुसज्ज स्पोर्ट्स क्रोनोग्राफ मोटर रेसिंग देखील आहे. ज्याची किंमत सुमारे ६९ लाख रुपये आहे.

फॅशन लेबल –

विराट कोहलीची पत्नी अनुष्का शर्माही करोडो रुपयांची मालक आहे. अनुष्काने २०१७ मध्ये स्वतःचे फॅशन लेबल लाँच केले आहे. विराटच्या पत्नीच्या या ब्रँडची किंमत जवळपास ६५ कोटी आहे.

हेही वाचा – क्रिकेट चाहत्यांसाठी आनंदाची बातमी; टी-२० विश्वचषक २००७ ची वेब सीरिज लवकरच प्रदर्शित होणार

बेंटले कॉन्टिनेंटल जीटी –

विराट कोहलीला गाड्यांची खूप आवड आहे. त्याच्याकडे अनेक महागडी वाहने आहेत. विराटच्या गॅरेजमधील सर्वात महागडी कार बेंटले कॉन्टिनेंटल जीटी आहे. विराटने २०१८ मध्ये ही कार खरेदी केली होती. विराटची ही कार त्याचा भाऊ विकास कोहलीच्या नावावर नोंदणीकृत आहे. या कारची किंमत सुमारे ३.८ कोटी आहे. या कारमध्ये अनेक सुपर गोष्टी आहेत. या कारमध्ये ५४२ अश्वशक्तीचे इंजिन असून ही कार ताशी ३१८ किमी वेगाने धावू शकते. याशिवाय कोहलीकडे दुसरी सर्वात महागडी कार बेंटले फ्लाइंग स्पर देखील आहे.

Story img Loader