ICC World Cup 2023, IND vs AUS Match Highlights: कांगारूंनी दिलेल्या २०० धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना १२ चेंडूत भारताची टॉप ऑर्डर फलंदाजांची फळी मोडकळीस आली होती. ऑस्ट्रेलियाने इशान किशन, रोहित शर्मा आणि श्रेयस अय्यर यांना शून्यावर माघारी पाठवल्यानंतर विराट कोहली व के. एल. राहुल ही जोडी भारत जिंकण्यासाठी एकमेव आशेचा किरण होती. आणि हाच किरण चेन्नईच्या मैदानात चमकून उठला आणि भारताने अवघ्या ४२ षटकांमध्येच विजय आपल्या नावे केला. दरम्यान पाचव्या क्रमांकावर फलंदाजीला आलेला के. एल. राहुल हा खऱ्या अर्थाने कालच्या सामन्यातील स्टार ‘सामनावीर’ ठरला. घाईने मैदानात उतरण्यापासून ते विराट कोहलीने खेळ सुरु करण्याआधी दिलेल्या कानमंत्राविषयी राहूलने मॅचनंतर विशेष उलगडा केला.
के.एल राहुल म्हणतो, मला श्वास घ्यायलाही वेळ नाही…
सामन्यानंतरच्या प्रेझेंटेशनमध्ये के. एल राहुल सामनावीराचा पुरस्कार घेत असताना त्याला असा प्रश्न विचारण्यात आला होता की, “अनपेक्षित वेळी मैदानावर यावे लागल्यावर विराट कोहलीने तुला काय सांगितलं होतं? ज्यावर राहुलने हसत सांगितलं की, “खरं सांगायचं तर आम्हाला काही बोलायला वेळच मिळाला नाही. मी नुकताच आंघोळ करून आलो होतो, मला वाटलं होतं आता जरा अर्धा-एक तास ब्रेक घेऊन आराम करेन आणि मग मैदानावर जावे लागेल पण मला श्वास घ्यायलाही वेळ मिळाला नव्हता आणि मी तसाच मैदानात गेलो. त्यामुळे अंघोळ करून मैदानावर येताना तर आधी मी श्वास घेण्याचाच प्रयत्न करत होतो.”
विराट कोहलीने राहुलला दिला होता कानमंत्र
यावेळी कोहली म्हणाला की, “विकेट राखून ठेवायची आहे आणि आता आपल्याला फक्त परफेक्ट शॉट्स खेळायचे आहेत. वाटल्यास काही काळ कसोटी क्रिकेटसारखे खेळू आणि मग बघू पुढे काय होतंय, कोहलीचा हा प्लॅन कामी आला आणि आम्ही संघाला विजय मिळवून देऊ शकलो आता याचा आनंद आहे.”, असं के. एल राहुलने पुढे सांगितलं.
IND vs AUS जिंकूनही के.एल. राहुल नाराज का? म्हणाला “मी जरा जास्तच चांगला शॉट मारला पण…”
दरम्यान, के. एल. राहुल व विराट कोहली ही जोडगोळी आशिया चषकाच्या वेळी सुद्धा कमाल चमकली होती. त्यानंतर आता विश्वचषकात सुद्धा त्यांनी उत्तम लै धरली आहे. सध्या आयसीसी वर्ल्डकप २०२३ च्या पॉईंट टेबलमध्ये भारत पाचव्या स्थानी आहे. तर पाकिस्तान तिसऱ्या स्थानी आहे. आता भारतीयांचे लक्ष १४ ऑक्टोबरला होणाऱ्या भारत विरुद्ध पाकिस्तान सामन्याकडे लागले आहे.