Virat Kohli got special birthday gift from fan video viral : भारताचा स्टार फलंदाज विराट कोहली सध्या खराब फॉर्मशी झुंज देत आहे. बांगलादेशनंतर न्यूझीलंडविरुद्धच्या कसोटी मालिकेत विराट सपशेल अपयशी ठरला. विराटचा हा वाईट टप्पा त्याच्या वाढदिवसाच्या आणि टीम इंडियाच्या ऑस्ट्रेलिया दौऱ्याच्या अगदी आधी आला आहे. अशा वेळी विराटच्या फॉर्ममध्ये परतण्यासाठी सर्वजण प्रार्थना करत आहेत. तो आज आपला ३६ वा वाढदिवस साजरा करत आहे. त्याला आपल्या वाढदिवशी चाहत्यांकडून खास गिफ्ट मिळाले आहे, ज्याचा व्हिडीओ व्हायरल होत आहे.

विराटला चाहत्यांने दिले खास गिफ्ट –

विराटला त्याच्या ३६ व्या वाढदिवसापूर्वी हे गिफ्ट मिळाले आहे. ५ नोव्हेंबर पूर्वी एक चाहता विराटला खास गिफ्ट देतानाचा व्हिडीओ समोर आला आहे. वाढदिवसापूर्वी आणि मुंबई कसोटीतील पराभवानंतर विराटचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे, ज्यामध्ये एका चाहत्याने त्याला हनुमानजींचा फोटो भेट दिला होता. विराट देखील हनुमानजींचा भक्त आहे आणि नीम करोली बाबाची पूजा करतो, ज्यांना हनुमानाचा अवतार मानले जाते.

दोन वर्षांपूर्वी २०२२ मध्ये विराटने नैनितालजवळील नीम करोली बाबाच्या आश्रमातील कैंची धामला भेट दिली होती. हा तो काळ होता जेव्हा विराट एका वाईट टप्प्यातून जात होता आणि कैंची धामला भेट दिल्यानंतर त्याचे नशीब बदलले. त्यानंतर पुढच्या एका वर्षात त्याने प्रत्येक फॉरमॅटमध्ये धावांचा पाऊस पाडला. आता चाहत्यांना एवढीच आशा असेल की ऑस्ट्रेलिया दौऱ्यापूर्वी हनुमानजी आणि नीम करोली बाबाच्या आशीर्वादाने विराट पुन्हा त्याच शैलीत फलंदाजी करताना दिसेल.

हेही वाचा – Peruvian Footballer : धक्कादायक! लाइव्ह सामन्यात वीज पडल्याने एका खेळाडूचा मृत्यू, तर पाच जण जखमी VIDEO व्हायरल

न्यूझीलंडविरुद्ध विराटची निराशाजनक कामगिरी –

विराट कोहलीच्या कामगिरीबद्दल सांगायचे तर, न्यूझीलंडविरुद्धच्या मुंबई कसोटी सामन्यात टीम इंडियाच्या पराभवालाही विराट कोहली जबाबदार होता. या सामन्याच्या पहिल्या डावात केवळ ४ धावा आणि दुसऱ्या डावात केवळ एक धावा करून कोहली बाद झाला. याआधीही मालिकेतील उर्वरित ४ डावांमध्ये कोहलीच्या खात्यात केवळ एक अर्धशतक आले होते. अशाप्रकारे त्याला संपूर्ण मालिकेत एकूण ९३ धावा करता आल्या. त्यामुळे फलंदाजीवर प्रश्न निर्माण झाले असून आता कोहलीची कारकीर्द संपल्याचे मानले जात आहे.

Story img Loader