Virat Kohli Asia Cup IND vs PAK: आशिया चषकातील बहुप्रतीक्षित सामना भारत विरुद्ध पाकिस्तान सलग दोन वेळा रद्द होऊन अखेरीस आज कोलंबो मध्ये पार पडत आहे. सुपर चार मधील या सामन्यासाठीची करावी लागलेली प्रतीक्षा पूर्णपणे फळाला आली अशी भावना प्रत्येक भारतीयाच्या मनात निर्माण होईल असा काहीसा खेळ आज पाहायला मिळाला. तब्बल सहा महिन्यांनी वापसी केलेला के. एल राहुल आज मैदानात चमकला. शतकपूर्ती करून नाबाद राहिलेल्या के. एलने आज अक्षरशः धावांचा पाऊस पाडला. त्याच्या जोडीने आज किंग कोहलीने शतकासह मोठ्या विक्रमला गवसणी घातली. आज विराटने आपले ४७ वे शतक पूर्ण केले तसेच १३,००० धावांचा टप्पा सर्वाधिक वेगाने गाठणारा तो पहिला खेळाडू ठरला. २४ शतकांपासून पुढे सुरु झालेल्या या सामन्यात पाऊस अद्याप तरी शांत आहे मात्र विराट व राहुलच्या धावांचा पाऊस सोशल मीडियावर चांगलाच चर्चेत आहे.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा