IND vs NZ Virat Kohli 50th Centuary Moment Video: टीम इंडियाचा स्टार फलंदाज विराट कोहलीने दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या विश्वचषक सामन्यात १०१ धावा करत मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरच्या ४९ वनडे शतकांच्या विश्वविक्रमाची बरोबरी केली होती. तर आज भारताच्या अत्यंत महत्त्वाच्या सामन्यात कोहलीने ५० वे शतक पूर्ण करत सचिन तेंडुलकरच्या समोरच त्याचा रेकॉर्ड पार केला आहे. यानंतर मैदानात एकच जल्लोष व उत्साह दिसून आला. विशेषतः विराटच्या एकमेवाद्वितीय कामगिरीनंतर स्वतः सचिन तेंडुलकरने जोरदार टाळ्या वाजवत कोहलीचे अभिनंदन केले. तर दुसरीकडे विराटची पत्नी व अभिनेत्री अनुष्का शर्मा हिची प्रतिक्रिया सुद्धा खास ठरत आहे.
आज भारत विरुद्ध न्यूझीलंड सामन्यातील धावांसह विराट विराट कोहलीने या विश्वचषकात ६७३ हून अधिक धावांचा रेकॉर्ड आपल्या नावे केला आहे. कोहली आता विश्वचषकात सर्वाधिक धावा करणारा फलंदाज बनला आहे.
Video: विराट कोहलीचे ५० वे शतक, पाहा तो क्षण
विराट कोहलीने रेकॉर्ड मोडून सचिनलाच केला नमस्कार
विराट कोहली आणि अनुष्काचा पिक्चर परफेक्ट क्षण
दरम्यान. आजच्या सामन्यातील विराटचं शतक हे त्याच्या खात्यातील आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधलं ८० वं शतक आहे. कसोटी प्रकारात विराटच्या नावावर २९ तर ट्वेन्टी२० प्रकारात एका शतकाची नोंद आहे. २००९ मध्ये विराटने वनडे कारकीर्दीतील पहिल्यावहिलं शतक झळकावलं होतं. १४ वर्षानंतर विराटने वनडे शतकांचं अर्धशतक पूर्ण केलं आहे.
हे ही वाचा<< शुबमन गिलचे आई – बाबा लेकासाठी प्रेक्षकांमधून वाजवत होते टाळ्या; तितक्यात कोहलीने केलं असं काही की..
जेव्हा विराटने ४९ वे शतक पूर्ण केले होते तेव्हाच सचिन तेंडुलकरने त्याला शुभेच्छा देताना, “मला ४९ ते ५० पर्यंत पोहोचण्यासाठी ३६२ दिवस लागले होते. मला आशा आहे की, पुढील काही दिवसांत तू ४९ वरून ५० वर पोहोचशील आणि माझा विक्रम मोडशील. अभिनंदन!!” असे म्हटले होते. आणि आज सचिनची ही इच्छा कोहलीने पूर्ण करून दाखवली आहे.