Virat Kohli and Anushka Sharma attended Krishna Das Kirtan : टीम इंडियाने न्यूझीलंडविरुद्धच्या तीन सामन्यांच्या मालिकेतील पहिली कसोटी पाचव्या दिवशी आठ गडी राखून गमावली. आता मालिकेतील दुसरा कसोटी सामना २४ ऑक्टोबरपासून पुण्यात खेळवला जाणार आहे. पहिला कसोटी सामना संपल्यानंतर विराट मुंबईला रवाना झाला. यानंतर २० ऑक्टोबर रोजी विराट पत्नी अनुष्का शर्मासह मुंबईतील नेस्को येथे कृष्ण दास यांच्या कीर्तनाला उपस्थित होता, ज्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये अनुष्का आणि विराटचा आनंदी दिसत आहेत. व्हिडिओमध्ये अनुष्का विराटसोबत टाळ्या वाजवताना ती कीर्तनाl रमल्याचे दिसत आहे. याशिवाय ती कीर्तनाचाही आनंद घेत आहे. यावेळी अनुष्का क्रीम रंगाच्या को-ऑर्डर सेटमध्ये खूप सुंदर दिसत होती. तसेच विराटने फुल-स्लीव्ह टी-शर्ट, निळ्या डेनिम पँट आणि लाल कॅप परिधान केली होती.

अनुष्का शर्मा आणि विराट कोहली कीर्तनात सहभागी होण्याची ही पहिलीच वेळ नाही. यापूर्वी जुलैमध्ये लंडनमध्ये अशाच एका कार्यक्रमात या कपलने हजेरी लावली होती. जूनमध्ये भारताच्या टी-२० विश्वचषक विजेतेपदानंतर कोहलीने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून ब्रेक घेतला, तेव्हा पण एक व्हिडिओ व्हायरल झाला होता. अनुष्काने त्यावेळी कीर्तनातील फोटो देखील शेअर केले होते. पहिल्या आणि दुसऱ्या कसोटी सामन्यात फारसा ब्रेक नाही. त्यामुळे विराट आज किंवा उद्या टीम इंडियात सामील होईल असे मानले जात आहे.

हेही वाचा – IPL 2025 Mega Auction च्या तारीख आणि ठिकाणाबद्दल आली मोठी अपडेट, जाणून घ्या कधी-कुठे पार पडणारा लिलाव?

बंगळुरू कसोटीबद्दल विराटने दुसऱ्या डावात ७० धावांची महत्त्वपूर्ण खेळी केली साकारली होती. बंगळुरू कसोटी ही बऱ्याच गोष्टींसाठी लक्षात ठेवली जाईल, ज्यात टीम इंडियाचे पहिल्या डावानंतरचे पुनरागमन देखील वर्षानुवर्षे लक्षात राहील. या सामन्यातील पहिल्या डावात विराट कोहली शून्यावर बाद झाला होता. विशेष म्हणजे त्याच्यासह पाच खेळाडूंना खाते उघडता आले नव्हते. ज्यामुळे भारतीय संघ अवघ्या ४६ धावांवर गारद झाला होता. यानंतर भारताने दुसऱ्या डावात कमबॅक केले, पण त्यांना सामना जिंकण्यात यश आले नाही. आता दोन्ही संघांतील पुढचा सामना पुण्यात खेळला जाणार आहे.

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Virat kohli and anushka sharma attended krishna das kirtan at nesco in mumbai video viral vbm