श्रीलंकेविरुद्धच्या वनडे आणि टी-२० मालिकेसाठी मंगळवारी बीसीसीआयने भारतीय संघाची घोषणा केली आहे. या अगोदर विराट कोहलीने श्रीलंकेविरुद्धच्या टी-२० मालिकेतून ब्रेक मागितला होता, तो मंजूर करण्यात आला आहे. विराट कोहली नवीन वर्ष सेलिब्रेट करण्यासाठी सुट्टीवर गेला आहे. विमानतळावर तो अनुष्का शर्मासोबत दिसला. कोहली श्रीलंकेविरुद्धच्या एकदिवसीय मालिकेतून भारतीय संघात पुनरागमन करेल.
विराट कोहली टीम इंडियासोबत बांगलादेशच्या दौऱ्यावर होता, तेथून तो मुंबईतील त्याच्या घरी परतला होता. त्यानंतर तो पत्नीसोबत नवीन वर्ष सेलिब्रेट करण्यासाठी मुंबईतून रवाना झाला आहे. बुधवारी विमानतळावर कोहली पांढरा स्वेटर आणि काळी पँट घातलेला दिसला. अनुष्काने काळ्या रंगाचा स्वेटर आणि पिवळी टोपी घातली होती.
विराट कोहलीने श्रीलंकेविरुद्धच्या टी-२० मालिकेतून ब्रेक घेतला आहे. श्रीलंकेविरुद्धच्या वनडे मालिकेत तो पुनरागमन करणार आहे. कोहलीने कुटुंबासोबत वेळ घालवण्यासाठी वैयक्तिक कारणांमुळे ब्रेक घेतला. तो आपल्या पत्नीसोबत नवीन वर्ष सेलिब्रेट करणार आहे.
भारत आणि श्रीलंका यांच्यात पहिल्यांदा टी-२० मालिका खेळली जाणार आहे. या मालिकेतील पहिला सामना ३ जानेवारीला मुंबई येथे खेळला जाणार आहे. त्याचबरोबर एकदिवसीय मालिकेला १० जानेवारी पासून सुरुवात होणार आहे. या दोन्ही मालिकेसाठी बीसीसीआयने १६ सदस्यीय संघ जाहीर केले आहेत.
टी-२० मालिकेसाठी संघ:
एकदिवसीय मालिकेसाठी संघ:
रोहित शर्मा (कर्णधार), शुभमन गिल, विराट कोहली, सूर्यकुमार यादव, श्रेयस अय्यर, केएल राहुल (यष्टीरक्षक), इशान किशन (यष्टीरक्षक), हार्दिक पांड्या (उपकर्णधार), वॉशिंग्टन सुंदर, यजुर्वेद्र चहल, कुलदीप यादव, अक्षर पटेल, मोहम्मद शमी, मोहम्मद सिराज, उमरान मलिक, अर्शदीप सिंग</p>