इंग्लंडमध्ये सुरु असलेल्या विश्वचषक स्पर्धेत भारतीय संघ ५ जून रोजी आपला पहिला सामना दक्षिण आफ्रिकेविरुद्ध खेळणार आहे. या सामन्यासाठी टीम इंडिया सध्या साऊदम्पटन शहरात कसून सराव करत आहे. या सरावादरम्यान भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहलीच्या अंगठ्याला दुखापतही झाली होती. मात्र ही दुखापत फारशी गंभीर नसल्यामुळे सर्वांचा जीव भांड्यात पडला आहे.

अवश्य वाचा – आनंदाची बातमी ! विराटची दुखापत गंभीर नाही, सलामीच्या सामन्यात खेळणार

विराट कोहलीने मैदानातील सरावानंतर जिममध्ये जात आज आपल्या सहकाऱ्यांसह व्यायाम करत आपल्या फिटनेसवर भर दिला. केदार जाधव, विजय शंकर, लोकेश राहुल, हार्दिक पांड्या, जसप्रीत बुमराह आणि भुवनेश्वर कुमार यांच्यासोबतचा फोटो विराटने आपल्या ट्विटर अकाऊंटवर शेअर केला आहे.

विश्वचषकासाठी भारताने समतोल संघाची घोषणा केली आहे. स्पर्धा सुरु होण्याआधी झालेल्या दोन सराव सामन्यांमध्ये भारताला एका सामन्यात विजय तर एका सामन्यात पराभवाचा सामना करावा लागला होता. त्यामुळे दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या सामन्यात भारतीय संघ कशी कामगिरी करतो हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.

Story img Loader