Coaching Beyond Book Controversy: विराट कोहलीसाठी सध्या महेंद्रसिंग धोनी (एमएस धोनी) शिवाय दुसरा मोठा कोणी नाही. विराट अनेकदा धोनी आणि त्यांच्या नात्याबद्दल बोलताना दिसला आहे, पण तुम्हाला माहित आहे का की हे मजबूत नाते एकेकाळी तुटू शकले असते. असाच खुलासा भारताचे माजी क्षेत्ररक्षण प्रशिक्षक आर श्रीधर यांच्या पुस्तकात (आर श्रीधर बुक कोचिंग बियॉंड) करण्यात आला आहे.

श्रीधर यांच्या पुस्तकानुसार, २०१६ मध्ये विराट कोहलीवर मर्यादित षटकांच्या क्रिकेटमध्ये कर्णधारपदाचे भूत बसले होते, तो कसोटीत कर्णधार बनला होता, पण मर्यादित षटकांच्या क्रिकेटमध्येही त्याला धोनीकडून कर्णधारपद हवे होते. यानंतर रवी शास्त्रींनी त्याचे आणि धोनीचे नाते तुटण्यापासून वाचवले.

Shreyas Iyer to captain Mumbai Team in Syed Mushtaq Ali Trophy Prithvi Shaw included in Squad Ajinkya Rahane
Shreyas Iyer: श्रेयस अय्यरच्या खांद्यावर ‘या’ संघाने कर्णधारपदाची दिली जबाबदारी! अजिंक्य रहाणेही अय्यरच्या नेतृत्त्वाखाली खेळणार
Nana Patole On Devendra Fadnavis :
Nana Patole : निकालाआधी राजकीय घडामोडींना वेग; यातच…
KL Rahul Statement on Sanjiv Goenka Animated Chat in IPL 2024 loss Said Wasn’t the nicest thing Ahead
KL Rahul: “मैदानावर जे काही घडलं ते फार चांगलं…”, संजीव गोयंका भर मैदानात भडकल्याच्या घटनेवर केएल राहुलने पहिल्यांदाच केलं वक्तव्य
Sanju Samson father Viswanath video viral
Sanju Samson : ‘३-४ लोकांमुळे माझ्या मुलाची १० वर्षें वाया गेली…’, संजू सॅमसनच्या वडिलांचे धोनी-विराटसह रोहित शर्मावर गंभीर आरोप, VIDEO व्हायरल
Pat Cummins attend Coldplay concert with wife missed ODI series decider against Pakistan ahead of Border-Gavaskar Trophy Get Trolled
Pat Cummins: पॅट कमिन्स भारताविरुद्धच्या मालिकेची तयारी सोडून कोल्डप्ले कॉन्सर्टला; ऑस्ट्रेलियाच्या विश्रांती देण्याच्या निर्णयावर टीका
Suryakumar Yadav made big mistake in India lost the second T20I against South Africa
Suryakumar Yadav : कर्णधार सूर्यकुमार यादवची ‘ती’ चूक टीम इंडियाला पडली महागात, यजमानांनी भारताच्या तोंडचा घास हिरावला
Tula Shikvin Changlach Dhada
भुवनेश्वरी आणि चारुलताच्या गोंधळात अक्षराच वेडी ठरणार; नेटकरी म्हणाले, “शिक्षिका असून सुद्धा…”

श्रीधर यांनी आपल्या पुस्तकाच्या पान क्रमांक ४२ वर असे काही लिहिले आहे ,ज्यामुळे धोनी आणि कोहली यांच्यातील संबंधात दुरावा निर्माण होऊ शकला असता. पुस्तकात लिहिले, “२०१६ मध्ये एक काळ असा आला होता, जेव्हा विराट मर्यादित षटकांच्या संघाचा कर्णधार बनण्यासाठी खूप उतावळा होता. त्याने काही अशा गोष्टी सांगितल्या होत्या, ज्यावरून तो कर्णधारपदाच्या शोधात असल्याचे दिसून आले होते.”

धोनी आणि कोहली यांच्यातील कर्णधारपदाचा संघर्ष रवी शास्त्रीने संपवला –

हेही वाचा –Jay Shah Tweet: पृथ्वी शॉचे कौतुक करणे जय शाहांना पडले चांगलेच महागात; आता होत आहेत ट्रोल, जाणून घ्या कारण

श्रीधरने यांनी पुढे लिहिले, “एका संध्याकाळी, रवीने त्याला फोन केला आणि म्हणाला, ‘हे बघ विराट, एमएसने तुला कसोटी क्रिकेटमध्ये (कर्णधारपद) दिले. त्याचा आदर करायला हवा. जेव्हा योग्य वेळ असेल, तेव्हा तो तुला टी-२० आणि वनडे क्रिकेटमध्ये कर्णधार पदाची संधी देईल. आता जोपर्यंत तू त्याचा आदर केला नाहीस, तर उद्या तू कर्णधार असशील तेव्हा तुला देखील तुझ्या संघाकडून सन्मान मिळणार नाही. आता काहीही झाले तरी त्याचा आदर करा. एक दिवस कर्णधारपद तुझ्याकडे येईल, तुला त्याच्या मागे धावण्याची गरज नाही.”

हेही वाचा – IND vs SL 2nd ODI: बॅकवर्ड पॉइंटवर अक्षर पटेल ठरला भारताची नवीन भिंत; टिपले तीन जबरदस्त झेल, पाहा VIDEO

अखेर विराटने रवी शास्त्रीचा हा सल्ला स्वीकारला. त्यानंतर वर्षभरातच त्याला मर्यादित षटकांचे कर्णधारपदही मिळाले. विराट कोहलीने जानेवारी २०१७ मध्ये सर्व फॉरमॅटमध्ये पूर्णवेळ कर्णधार म्हणून जबाबदारी स्वीकारली. त्यानंतर २०२२ पर्यंत भारताचे नेतृत्व करण्यासाठी सज्ज केले. २०२१ च्या टी२० विश्वचषकानंतर विराटने टी२० कर्णधारपद आणि २०२२च्या दक्षिण आफ्रिका दौऱ्यानंतर कसोटी कर्णधारपद सोडले.