Virat Kohli and Gautam Gambhir emotional hug video : भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील बॉर्डर गावस्कर ट्रॉफीतील पहिली कसोटी ऑप्टस क्रिकेट स्टेडियमवर खेळली जात आहे. या सामन्यातील दुसऱ्या डावात स्टार फलंदाज विराट कोहलीने नाबाद शतकी खेळी साकारत फॉर्ममध्ये परतला आहे. आता किंग कोहलीने टीकाकारांना चोख प्रत्युत्तर दिले. विराटने दुसऱ्या डावात १४३ चेंडूत आपले शतक पूर्ण केले. विराट कोहलीच्या कसोटी कारकिर्दीतील हे ३० वे शतक ठरले. शतक झळकावून ड्रेसिंग रूममध्ये परतत असताना त्याने मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीर मिठी मारली, ज्याचा व्हिडीओ व्हायरल होत आहे.
विराट कोहलीने ऑस्ट्रेलियात सातवे कसोटी शतक झळकावत अनेक विक्रम मोडीत काढले. आता कोहलीच्या नावावर आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये ८१ शतकांची नोंद झाली आहे. विराट कोहली शतक झळकावून ड्रेसिंग रूममध्ये परतत असताना त्याच्या आणि मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीर यांच्यातील एक खास भावनिक क्षण पाहिला मिळाल, जो कॅमेऱ्यात कैद झाला.
शतक झळकावल्यानंतर विराटने गंभीरला मारली मिठी –
खरे तर विराट कोहलीने आपले शतक पूर्ण करताच भारतीय संघाने ६ गडी बाद ४८७ धावा करून डाव घोषित केला. यानंतर विराट कोहली शतक झळकावून ड्रेसिंग रुममध्ये परतत होता. सगळे त्याचे अभिनंदन करत होते. त्यावेळी विराट कोहलीने ड्रेसिंग रुममध्ये पाऊल ठेवताच क्षणी मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीर समोर येतो. दोघेही एकमेकांकडे पाहतात आणि टाळी देऊन घट्ट मिठी मारतात. चाहत्यांसाठी आणि दोन्ही दिग्गजांसाठी हा क्षण भावनिक होता. आयपीएलदरम्यान कोहली आणि गंभीरचे संबंध थोडेसे बिघडले होते. दोघेही मैदानावर एकमेकांशी भांडले होते. मात्र आता त्यांच्या नात्याला नवे वळण मिळाले आहे.
विराट कोहलीची आंतरराष्ट्रीय कारकीर्द –
३६ वर्षीय विराट कोहलीची आतापर्यंतची कसोटी कारकीर्द अप्रतिम राहिली आहे. त्याने ११९ कसोटी सामन्यांच्या २०३ डावांमध्ये ९१४५ धावा केल्या आहेत, ज्यामध्ये त्याने आपल्या बॅटने ३० शतके आणि ३१ अर्धशतके केली आहेत. याशिवाय किंग कोहलीने २९५ वनडेमध्ये १३९०६ धावा केल्या आहेत. कोहलीने एकदिवसीय क्रिकेटमध्ये ५० शतके आणि ७२ अर्धशतके केली आहेत. टी-२० मध्ये विराटने १२५ सामन्यात १ शतक आणि ३८ अर्धशतकांसह ४१८८ धावा केल्या आहेत.