WI vs IND: वेस्ट इंडीजविरुद्ध होणाऱ्या पाच टी-२० सामन्यांच्या मालिकेसाठी भारतीय संघाची घोषणा करण्यात आली आहे. या मालिकेसाठी भारतीय फलंदाज विराट कोहली आणि वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह यांना विश्रांती देण्यात आली आहे. 29 जुलैपासून त्रिनिदाद आणि टोबॅगो येथे वेस्ट इंडिजविरुद्धच्या पाच टी-२० सामन्यांची मालिका खेळवण्यात येणार आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

काही दिवसांपूर्वीच वेस्ट इंडिजविरुद्ध होणाऱ्या वनडे मालिकेसाठी टीम इंडियाची घोषणा करण्यात आली होती. यावेळी रोहित शर्मा, विराट कोहली, जसप्रीत बुमराह आणि ऋषभ पंत या खेळाडूंना विश्रांती देण्यात आली होती. टीम इंडिया सध्या इंग्लंड दौऱ्यावर आहे. या मालिकेनंतर भारतीय संघ वेस्ट इंडिज दौऱ्यावर जाणार आहे.

टी-२० साठी असा असेल संघ –

रोहित शर्मा (कॅप्टन), ईशान किशन, केएल राहुल, सूर्यकुमार यादव, डी हुड्डा, एस अय्यर, डी कार्तिक, रिषभ पंत, हार्दिक पांड्या, रविंद्र जडेजा, अक्षर पटेल, आर अश्विन, आर बिश्नोई, कुलदीप यादव, भूवनेश्वर कुमार, आवेश खान, हर्षल पटेल, अर्शदीप सिंग</p>

हेही वाचा – आयपीएलमध्ये अथक खेळता, देशासाठी खेळायच्या वेळी मात्र विश्रांती! सुनील गावसकरांकडून वरिष्ठ खेळाडूंची कान उघडणी

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Virat kohli and jasprit bumrah rested for t20 series against west indies spb