ICC World Test Championship Final 2023 : वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या फायनलसाठी टीम इंडियाचा पहिला ग्रुप इंग्लंडला रवाना झाला आहे. यामध्ये जवळपास २० सदस्यांचा समावेश आहे. टीम इंडियाचे प्रशिक्षक राहूल द्रविडसह सपोर्ट स्टाफचे अन्य सदस्यांचा समावेश आहे. या फायनलसाठी संपूर्ण संघ आयपीएल फायनलनंतर ३० मे पर्यंत पोहोचणार आहे. ज्या खेळाडूंचा संघ आयपीएल प्ले ऑफच्या आधी बाहेर झाला, ते खेळाडू पहिल्या ग्रुपमध्ये सामील झाले आहेत. यामध्ये अक्षर पटेल, शार्दूल ठाकूर आणि मोहम्मद सिराज या खेळाडूंचा समावेश आहे. तर विराट कोहली आणि रविचंद्रन अश्विनसारखे दिग्गज खेळाडू २४ मे ला रवाना होऊ शकतात.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

आयपीएल २०२३ मध्ये कोलकाता नाईट रायडर्स संघात सहभाग असलेला खेळाडू उमेश यादवही इंग्लंडला जाणार आहे. नेट गोलंदाज आकाश दीप (बंगालचा मीडियम पेसर) आणि पुलकित नारंग (दिल्लीचा ऑफ स्पिनर) पहिल्या ग्रुपचा भाग होऊ शकतात. तर राजस्थानचा लेफ्ट आर्म पेसर अनिकेत चौधरी आणि आंध्रप्रदेशचा लेफ्ट आर्म पेसर पृथ्वी राज इंग्लंडला नंतर पोहोचणार आहेत. बीसीसीआय आयपीएलच्या लीग स्टेजच्या सामन्यांनंतरच काही खेळाडूंना इंग्लंडला पाठवणार आहे. तर काही खेळाडूंनी बीसीसीआयकडे परवानगी मागितली आहे की, त्यांना काही दिवसानंतर इंग्लंडला जाण्याची परवानगी द्या.

नक्की वाचा – “कोहली नाही फक्त शुबमन गिलचं कौतुक…”, सौरव गांगुलीच्या ट्वीटमुळं चाहते भडकले, म्हणाले, “दादा शर्ट काढला म्हणून…”

बीसीसीआयच्या एका अधिकाऱ्याने सांगितलं की, ३० मे पर्यंत दररोज खेळाडू रवाना होतील.दिग्गज वेगवान गोलंदाज जयदेव उनादकट नॅशनल क्रिकेट अकॅडमीमध्ये त्याच्या दुखापतीवर मात करत होता. या फायनलसाठी तो फिट होण्याची आशा आहे आणि २७ मे नंतर इंग्लडला जाऊ शकतो. तर तीन स्टॅंडबाय खेळाडूंमध्ये मुकेश कुमार पहिल्या ग्रुपचा भाग असणार आहे आणि दुसरे दोन खेळाडू ऋतुराज गायकवाड आणि सूर्यकुमार यादव त्यांच्या आयपीएल संघांचे सामने झाल्यानंतर रवाना होणार आहेत.