Virat Kohli and Steve Smith praised Ben Stokes after his knock: ॲशेस मालिकेत इंग्लंड संघाला सलग दुसऱ्या पराभवाला सामोरे जावे लागले आहे. लॉर्ड्सवर खेळल्या गेलेल्या दुसऱ्या कसोटी सामन्यात संघाला ऑस्ट्रेलियाकडून ४३ धावांनी पराभव पत्कारावा लागला. या सामन्याच्या दुसऱ्या डावात इंग्लिश कर्णधार बेन स्टोक्सने १५५ धावांची शानदार खेळी केली. त्याच्या फलंदाजीचे सर्वांनी कौतुक केले आहे. तसेच जगातील दोन महान खेळाडूं विराट कोहली आणि स्टीव्ह स्मिथ यांनी देखील बेन स्टोक्सच्या कामगिरीचे कौतुक केले आहे.
विराट कोहलीकडून बेन स्टोक्सचे कौतुक –
विराट कोहलीला स्टोक्सबद्दल बोलले एक जुने वाक्य आठवले. त्याने ट्विट करून स्टोक्सचे कौतुक केले. तसेच कोहलीने ऑस्ट्रेलियाचा संघ चांगला असल्याचे सांगितले. त्याने लिहिले, “मी विनोदाने बेन स्टोक्सला माझ्याविरुद्ध खेळलेला सर्वात चांगला प्रतिस्पर्धी खेळाडू म्हटले नव्हते. सर्वोच्च दर्जाची खेळी पण सध्या ऑस्ट्रेलियाचा संघ खूप चांगला आहे.” कोहलीने स्टोक्सचे अनेकदा कौतुक केले आहे. त्याला स्टोक्सला त्याच्या संघात (आरसीबी) आयपीएलमध्ये सामील करायचे होते.
स्टीव्ह स्मिथ काय म्हणाला?
बेन स्टोक्सविरुद्ध खेळणाऱ्या ऑस्ट्रेलियाच्या स्टीव्ह स्मिथनेही त्याचे कौतुक केले आहे. तो म्हणाला की स्टोक्स हा अविश्वसनीय खेळाडू आहे. त्याने अनेक अविश्वसनीय गोष्टी केल्या आहेत. स्मिथ म्हणाला, “त्याने या मैदानावर वेगवेगळ्या फॉरमॅटमध्ये काही अविश्वसनीय गोष्टी केल्या आहेत. तो शॉर्ट एंडला टार्गेट करत होता. त्याने दुसऱ्या टोकाला पहिला शॉट खेळला आणि तो बाद झाला.”
स्टोक्स बाद होताच ऑस्ट्रेलियाच्या आशा पल्लवित झाल्या होत्या. तो आऊट झाल्यानंतर पॅव्हेलियनमध्ये परतत असताना केवळ इंग्लंडचेच नव्हे तर ऑस्ट्रेलियाचे प्रेक्षकही त्याच्यासाठी टाळ्या वाजवत होते. स्टोक्स ११४ धावांवर असताना स्मिथने त्याचा झेल सोडला होता. यावर ऑस्ट्रेलियाचा उप कर्णधार म्हणाला की, मी चेंडू पकडू शकलो नाही. तो झेल पकडणे खूप अवघड होते. स्टोक्ससारख्या खेळाडूला जीवदान देणं कठीण असते