Virat Kohli Angry Reaction After Wicket IND vs ENG : आज, एकदिवसीय विश्वचषक २०२३ च्या २९व्या सामन्यात भारताचा सामना गतविजेत्या इंग्लंडशी होत आहे. या सामन्यात दोन्ही संघांमध्ये चुरशीची स्पर्धा पाहायला मिळत आहे. भारताचा स्टार फलंदाज विराट कोहलीने सध्या सुरू असलेल्या एकदिवसीय विश्वचषकात इंग्लंडविरुद्ध सामन्यात शून्य धावांचा भोपळाही न फोडता पॅव्हेलियनची वाट धरली होती. इतक्या स्वस्तात विकेट गमावल्यानंतर ड्रेसिंग रूममध्ये पोहोचताच कोहली स्वतःवरच नाराज असल्याचे दिसून आले. ड्रेसिंग रूममधील सोफ्यावर बसलेल्या विराट कोहलीचा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
विराट कोहली हा डेव्हिड विली च्या गोलंदाजीवर मिड-ऑनवर चौकार मारण्याचा प्रयत्न करत असताना त्याने भिरकावलेला चेंडू थेट बेन स्टोक्सकडे गेला आणि पहिल्याच बॉलवर कोहलीने आपली मोलाची विकेट गमावली. संपूर्ण पॉवरप्लेमध्ये म्हणजे पहिली १० षटके इंग्लंडने भेदक गोलंदाजी केली. ज्याच्या जोरावर त्यांनी केवळ ३५ धावा देत दोन विकेट्स घेतल्या. ख्रिस वोक्सने शुबमन गिलला (९) त्रिफळाचीत केले, तर डेव्हिड विलीने विराट कोहलीला (०) स्टोक्सकरवी झेलबाद केले होते. या अनपेक्षित विकेटनंतर ड्रेसिंग रूममधील सोफ्यावर बसलेला कोहली सोफ्याच्या बाजूला आपला हात आपटताना दिसून आला.
Video: विराट कोहली, गोल्डन डकनंतर ड्रेसिंग रूममध्ये नाराज
भारताची टॉप ऑर्डर व मिडल ऑर्डर फलंदाजांची फळी ही आज इंग्लंड समोर अगदीच कमकुवत दिसून आली आहे. पहिली फलंदाजी करताना भारताने केवळ २२९ धावा करून इंग्लंडला २३० धावांचे लक्ष्य दिले आहे. विश्वचषकात हे लक्ष्य अगदीच कमी असल्याने आता टीम इंडियाची विजयी घोडदौड कायम राखण्याची जबाबदारी ही भारतीय गोलंदाजांवर आहे.