CoronaVirus Outbreak : करोनाच्या तडाख्यामुळे जगभरात भीतीचे वातावरण आहे. लाखो लोकांना करोना व्हायरसचा फटका बसला आहे. प्रत्येक देश आपापल्या परीने या व्हायरसशी झुंज देत आहे. विविध उपाययोजना करण्यात येत आहेत. डॉक्टर आणि रूग्णालयातील इतर सहकाऱ्यांच्या अथक परिश्रमामुळे काही प्रमाणात लोक करोनातून बरे होत आहेत. पण असे असले तरी सध्या देशात करोनाग्रस्तांची संख्या प्रचंड वाढत आहे. राज्यात देखील करोना रुग्णांच्या संख्येत झपाट्याने वाढ होताना दिसत आहे. अशा स्थितीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या लढाईचा सामना करण्यासाठी आर्थिक मदतीसाठी पीएम केयर निधीत आर्थिक मदत करण्याचे आवाहन केले आहे. त्यास उत्तम प्रतिसाद मिळत असून अनेक कलाकार, व्यापारी मंडळी, उद्योगपती, क्रीडापटू, संस्था आणि सर्वसाधारण जनता करोनावर मात करण्यासाठी पुढे सरसावली आहे.
WC 2011 Flashback : आजच भारताने पााकिस्तानविरोधात केला होता हा पराक्रम
योग्य ती काळजी आणि उपचार घेतल्यास हा आजार बरा होऊ शकतो, यावर साऱ्यांचा विश्वास असून भारतातही याबाबत जनजागृती केली जात आहे. म्हणूनच सर्व स्तरातून मदतीचा ओघ सुरू आहे. पंतप्रधानांच्या आवाहनाला टीम इंडियाचा कर्णधार विराट कोहली आणि त्याची पत्नी अभिनेत्री अनुष्का शर्मा यांनीही प्रतिसाद दिला आहे. या दोघांनी मुख्यमंत्री सहायता निधी आणि प्रधानमंत्री सहायता निधीमध्ये सढळ हस्ते मदत करण्याचे जाहीर केले आहे. विराटने ट्विट करून याबद्दल माहिती दिली आहे.
ज्वाला गुट्टाला आली बॉयफ्रेंडची आठवण; त्याने दिला झकास रिप्लाय
“अनुष्का आणि मी पीएम-केयर्स फंड आणि मुख्यमंत्री सहायता निधीला (महाराष्ट्र) आमची साथ देणाप आहोत. लोकांचे दु:ख बघून आमचे मन विषण्ण झाले आहे. आम्हाला आशा आहे की आम्ही दिलेल्या योगदानामुळे नागरिकांच्या वेदना कमी होण्यास मदत होईल”, असे ट्विट विराटने केले आहे. मात्र, केंद्र आणि राज्य सरकारला किती निधी देणार हे त्याने ट्विटमध्ये नमूद केलेले नाही.
हार्दिक-नताशाचा फोटो पाहून तुम्हीही म्हणाल… “व्यायाम तर केलाच पाहिजे’
Anushka and I are pledging our support towards PM-CARES Fund & the Chief Minister’s Relief Fund (Maharashtra). Our hearts are breaking looking at the suffering of so many & we hope our contribution, in some way, helps easing the pain of our fellow citizens #IndiaFightsCorona
— Virat Kohli (@imVkohli) March 30, 2020
याआधी मास्टरब्लास्टर सचिन तेंडुलकर याने केंद्र आणि राज्य सरकारला प्रत्येकी २५ लाख, बीसीसीआयने ५१ कोटी, कर्नाटक राज्य क्रिकेट संघटनेने ५० लाख केंद्र आणि राज्य सरकारला देण्याची घोषणा केली आहे.