भारतीय संघाचा स्टार फलंदाज विराट कोहलीला टी-२० विश्वचषक २०२२ संपल्यानंतर विश्रांती देण्यात आली आहे. यामुळे तो सध्या कुटुंबासोबत वेळ घालवत आहे. नुकतेच विराट कोहली आणि त्याची पत्नी अनुष्का शर्मा मुंबई विमानतळावर एकत्र दिसले होते. यादरम्यान, हे जोडपे विमानतळावर पोहोचताच उभ्या असलेल्या गार्डने त्यांना थांबवले आणि व्हिडिओ बनवला.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

आता यासोबतच कोहली आणि अनुष्काचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. चाहत्यांना हा व्हिडिओ खूप आवडला ते मोठ्या प्रमाणात शेअर करत आहेत. या व्हिडिओमध्ये अनुष्का आणि विराट त्यांच्या पांढऱ्या आणि काळ्या रंगाच्या कॅज्युअल पोशाखात जुळे दिसत आहेत. अनुष्का तिच्या काळ्या बकेट हॅट लूकमध्ये दिसत आहे तर विराटने स्वेटशर्टवर ए अक्षर असलेल्या पोशाखात आहे.

विराट आणि अनुष्काने फोटोग्राफर्सना त्यांची मुलगी वामिकाचे फोटो क्लिक करू नयेत अशी विनंती केली आहे, या विनंतीचे मोठ्या प्रमाणात पालन करण्यात आले आहे. तसेच कोहली-अनुष्काने म्हटले आहे की, वामिकाने सोशल मीडिया एक्सपोजरबाबत स्वतःचे निर्णय स्वत: घ्यावेत आणि त्यासाठी तिला मोठे व्हावे लागेल.

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Virat kohli anushka sharma virat kohli anushka sharma seen at mumbai airport video viral vbm