Saurav Ganguly On Virat Kohli: २०२१ च्या टी२० विश्वचषकात भारताच्या अपयशी खेळीनंतर कोहलीने T20I कर्णधारपद सोडण्याचा निर्णय घेतला. पण या निर्णयावरून विराट कोहली आणि सौरव गांगुली यांच्यातील संबंध शत्रुत्वाचे असल्याच्या चर्चा रंगू लागल्या होत्या. काहीच दिवसात कोहलीने वनडे आणि कसोटी कर्णधारपदही सोडले. पण त्याला एकदिवसीय आणि कसोटी कर्णधारपद सोडायचे नसतानाही बीसीसीएआयने एकदाही कोहलीना पुनर्विचार करण्याबाबत आग्रह न केल्याने तो त्याच्या निर्णयावर अढळ राहिला अशा चर्चा सुद्धा वाऱ्याच्या वेगाने पसरू लागल्या . पण अलीकडेच एका कार्यक्रमात बोलताना त्यावेळचे बीसीसीआयचे अध्यक्ष व भारताचा माजी खेळाडू सौरव गांगुली याने कोहलीला संघाच्या कर्णधारपदावरून काढून टाकण्यामध्ये आपलं काहीच योगदान नसल्याचं म्हटलं आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

सौरव गांगुलीने म्हटल्याप्रमाणे, त्याने उलट कोहलीला T20I मध्ये नेतृत्व करणे सुरू ठेवण्याची विनंती केली होती, कारण निवडकर्त्यांना असे वाटत होते की जर व्हाईट-बॉल क्रिकेटच्या संघामध्ये दोन भिन्न कर्णधार असतील तर नेतृत्व करणे कठीण होऊ शकते.

दादागिरी अनलिमिटेड सीझन 10 या रिअॅलिटी शोमध्ये गांगुली म्हणाला, “मी विराटला कर्णधारपदावरून हटवले नाही. मी हे अनेकदा सांगितले आहे. त्याला T20I चे नेतृत्व करण्यास रस नव्हता. त्यामुळे, त्याने हा निर्णय घेतल्यानंतर, मी त्याला सांगितले, जर तुला T20I चे नेतृत्व करण्याची इच्छा नसेल, तर तू संपूर्णपणे व्हाईट बॉल क्रिकेटच्या कर्णधार पदावरून पायउतार झालास तर बरे होईल. मग आपल्याकडे पांढऱ्या चेंडूचा कर्णधार आणि लाल चेंडूचा कर्णधार वेगवेगळा असेल.”

गांगुलीने असेही खुलासा केला की रोहित शर्माला तिन्ही फॉरमॅटमध्ये नेतृत्व करण्याची इच्छा नव्हती परंतु आम्ही त्याला कर्णधारपदाची जबाबदारी स्वीकारण्यासाठी तयार केलं.

हे ही वाचा<< “मी विराट कोहली नाही पण माझा..”, अश्विनचं स्पष्ट उत्तर; म्हणाला, “मी जेवणाचाही त्याग केला, पण मला हाच टॅग..”

“मी रोहित शर्माला कर्णधारपदाची जबाबदारी स्वीकारण्यासाठी थोडासा आग्रह केला कारण त्याला खेळाच्या तिन्ही फॉरमॅटमध्ये नेतृत्व करण्यात रस नव्हता. त्यामुळे कदाचित त्यात माझे थोडे योगदान असेल पण संघाचा चालक कोण आहे, यापेक्षा जास्त श्रेय हे खेळाडूंचेच आहे. जे मैदानावर चांगली कामगिरी करतात. भारतीय क्रिकेटच्या भल्यासाठी काम करण्यासाठी माझी बीसीसीआयच्या अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली होती, त्याचा हा एक छोटासा भाग होता, असे गांगुली म्हणाला.

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Virat kohli as team india captain was not removed by me says saurav ganguly revels the chat after years says i helped rohit svs