धडाकेबाज फलंदाज विराट कोहलीने आयसीसीच्या एकदिवसीय क्रिकेट क्रमवारीत दुसऱ्या स्थानावर झेप घेतली आहे. भारतीय फलंदाजाकडून साकारलेली ही सर्वोत्तम कामगिरी म्हटली जात आहे. याशिवाय फलंदाज शिखर धवन आणि कर्णधार महेंद्रसिंग धोनी अव्वल दहा क्रमांकांमध्ये आहेत.
सध्या ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या मालिकेत भारताच्या कसोटी संघाचे नेतृत्व करणाऱ्या कोहलीच्या खात्यावर ८६२ गुण जमा आहेत. क्रमवारीत अग्रस्थानावर असलेल्या दक्षिण आफ्रिकेच्या ए बी डी’व्हिलियर्सपासून तो २५ गुणांनी पिछाडीवर आहे. ऑस्ट्रेलियाच्या दौऱ्यावर धावांसाठी झगडणारा धवन पाचव्या स्थानावर आहे, तर धोनी दहाव्या स्थानावर आहे.
गोलंदाजांच्या क्रमवारीत वेगवान गोलंदाज भुवनेश्वर कुमार आणि दुखापतग्रस्त फिरकीपटू रवींद्र जाडेजा अव्वल दहा जणांमध्ये आहेत. हे दोन भारतीय अनुक्रमे आठव्या आणि नवव्या स्थानावर आहेत.
पुढील काही दिवसांत ऑस्ट्रेलिया, इंग्लंड आणि भारत अशी तिरंगी एकदिवसीय क्रिकेट स्पर्धा होणार आहे. तर न्यूझीलंड आणि श्रीलंका यांच्यात सात एकदिवसीय सामन्यांची मालिका होणार आहे. त्यामुळे ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंडमध्ये १४ फेब्रुवारीपासून सुरू होणाऱ्या विश्वचषक क्रिकेट स्पध्रेत आयसीसी क्रमवारीतील उत्तम स्थानांसह सहभागी होण्यासाठी सर्वच खेळाडू उत्सुक आहेत.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा