Virat Kohli Anushka Sharma Ram Mandir Invitation: बीसीसीआयकडून परवानगी घेऊन आता भारताचा स्टार फलंदाज विराट कोहली सोमवारी २२ जानेवारीला होणाऱ्या अयोध्या येथे राम मंदिराच्या अभिषेक सोहळ्याला उपस्थित राहणार असल्याची माहिती आहे. भारतीय संघ बुधवार, १७ जानेवारी रोजी अफगाणिस्तानविरुद्धच्या तिसऱ्या टी-२० सामन्यानंतर दोन दिवसांचा ब्रेक घेणार आहे. राजीव गांधी आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर २५ जानेवारीपासून सुरू होणाऱ्या इंग्लंडविरुद्धच्या पहिल्या कसोटी सामन्यापूर्वी २० जानेवारीला संघ हैदराबादमध्ये एकत्र येणार आहे.

१६ सदस्यीय संघ हैदराबादमध्ये आल्यावर लगेचच सराव सुरु होईल मात्र क्रिकबझमधील वृत्तानुसार, राम मंदिराच्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्याला उपस्थित राहण्यासाठी कोहली २१ जानेवारी रोजी सराव सत्रानंतर अयोध्येला जाणार आहे. कोहली व अनुष्का शर्माच्या मुंबईतील निवासस्थानी त्यांना कार्यक्रमाची आमंत्रण पत्रिका देण्यात आली होती. तसेच, भारताचे माजी क्रिकेटपटू एमएस धोनी आणि सचिन तेंडुलकर यांनाही प्रभू श्रीरामाच्या घरवापसीच्या भव्य सोहळ्यासाठी आमंत्रित करण्यात आले आहे.

Congress Priyanka Gandhi road show today in West Nagpur and Gandhi Gate, Mahal in Central Nagpur
प्रियंका गांधी यांची प्रतीक्षाच, पण बघ्यांची मोठी गर्दी
21 November 2024 Rashi Bhavishya
२१ नोव्हेंबर पंचांग: वर्षातील शेवटचा गुरुपुष्यामृत योग कोणत्या…
Mohammed Shami Will Join Team India Squad for Border Gavaskar Trophy After 2nd Test Reveals Childhood Coach IND vs AUS
IND vs AUS: मोहम्मद शमी बॉर्डर गावस्कर ट्रॉफीसाठी भारतीय संघात कधी होणार सामील? कोचने दिले अपडेट
Amit Shah left public meeting after five minutes due to fear of helicopter couldnt fly after 6 pm
हेलिकॉप्टर उडणार नाही ही भीती; पाच मिनिट अन् गृहमंत्री अमित शहा सभा सोडून…
Mumbai traffic routes marathi news
मुंबई: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सभेसाठी वाहतुकीत बदल
udayanraje bhosale attack rahul gandhi while talking to media
सातारा: राहुल गांधी यांच्याकडून शिवाजी महाराजांची बदनामी; उदयनराजे यांचा हल्लाबोल
The decision regarding the permission of the meeting at Shivaji Park Maidan is now with the Urban Development Department mumbai news
शिवाजी पार्क मैदानवरील सभेच्या परवानगीचा निर्णय आता नगरविकास विभागाकडे
Loksatta vyaktivedh Dairy personality Ravindra Pandurang Apte former president of Gokul passed away
व्यक्तिवेध: रवींद्र आपटे

दरम्यान, अफगाणिस्तानविरुद्धच्या तिसऱ्या टी २० सामन्यापूर्वी कोहली बंगळुरू येथे एम. चिन्नास्वामी स्टेडियममध्ये सराव करताना दिसला होता. नवीन उल हकच्या गोलंदाजीवर मिड-ऑफला आउट होण्यापूर्वी स्टार फलंदाजाने पाच चौकारांसह २९ (१६ ) अशी कामगिरी केली होती. विराट कोहलीच्या खेळण्याच्या शैलीवर व स्ट्राइक रेटबाबत बोलताना अनेक माजी खेळाडूंनी मालिकेपूर्वी दावा केला होता की आधुनिक T20I च्या निकषांना कोहलीचा खेळ साजेसा नाही.

हे ही वाचा<< अयोध्या: राम मंदिर उद्घाटनाला अदाणी- अंबानी, कोहली- तेंडुलकर ते ‘या’ बॉलिवूड सेलिब्रिटींनाही आमंत्रण, पाहा यादी

मात्र, निवडकर्त्यांनी टी २० विश्वचषक २०२४ च्या आधी पुन्हा एकदा कोहली आणि कर्णधार रोहित शर्मावर विश्वास दाखवला. आता १ जूनपासून वेस्ट इंडिज आणि यूएसएमध्ये सुरू होणार्‍या मेगा इव्हेंटमध्ये ही जोडी संघाचा भाग होण्याची शक्यता आहे.