सध्या यूएईमध्ये आशिया चषक स्पर्धेचा थरार सुरू आहे. सध्या सुपर-४ फेरीतील लढती सुरू असल्यामुळे प्रत्येक सामन्यात अटीतटीची लढाई पाहायला मिळत आहे. ४ सप्टेंबर रोजी झालेला भारत-पाकिस्तान सामना तर चांगलाच रोमहर्षक आणि थरारक ठरला. या सामन्यात भारताच पराभव झाला. भारताचा वेगवान गोलंदाज अर्शदीप सिंगने एक झेल सोडल्यामुळे सामन्याची सर्वच गणितं बदलली. दरम्यान, याच कारणामुळे त्याच्यावर टीका होत आहे. मात्र भारताचा स्टार फलंदाज विराट कोहलीने त्याची पाठराखण केली आहे. अशा अटीतटीच्या सामन्यांत आणि दबावाखाली खेळताना चुका होत असतात, असे कोहली म्हणाला आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

हेही वाचा >>>IND vs PAK : ऋषभ अवघ्या १४ धावा करून परतला अन् कॅप्टन रोहित खवळला, लोकांनी पुन्हा घेतलं उर्वशी रौतेलाचं नाव

विराट कोहलीने केली अर्शदीपची पाठराखण

“कोणाकडूनही चुका होऊ शकतात. भारत-पाकिस्तान सामन्यात खुप दबाव होता. मात्र या चुकांतून शिकणे गरजेचे आहे. तसेच या चुकांमधून धडा घेऊन पुढे वाटचाल करायची असते. सध्या भारतीय संघामध्ये खूप चांगले वातावरण आहे. जेव्हा काही चुका घडतात तेव्हा वरिष्ठ खेळाडू मार्गदर्शन करतात. खेळाडू चुकीतूनच शिकत असतात. चुकांमधून धडा घेऊन पुन्हा एकदा तशा परिस्थितीस तोंड देण्यास सज्ज झाले पाहिजे,” असे विराट कोहली म्हणाला.

हेही वाचा >>>IND vs PAK Asia Cup 2022 : दोनच चेंडू खेळला अन् कमाल केली, जे विराटला जमलं नाही ते बिश्नोईने केलं

सामन्यात नेमकं काय घडलं होतं?

४ सप्टेंबर रोजी भारत-पाक यांच्यातील सामन्यात १८ वे षटक सुरू असताना पाकिस्तानला ३४ धावांची गरज होती. यावेळी पाकिस्तानकडून खुशदील शाह आणि असिफ अली फलंदाजी करत होते. रवी बिश्नोईने टाकलेल्या चेंडूला असिफ अलीने टोलवण्याचा प्रयत्न केला. मात्र चेंडू हवेत गेला त्यामुळे अर्शदीपला हा झेल टिपण्याची चांगली संधी होती. मात्र तो झेल टिपू शकला नाही. पुढे असिफ अलीला जीवदान मिळाल्यामुळे त्याने मोठे फटके लगावले. शेवटच्या दोन षटकांत भारतीय गोलंदाज पाकिस्तानी फलंदाजांना रोखू शकले नाही आणि संघाच्या काही चुकांमुळे भारताचा पराभव झाला.