‘बीसीसीआय’चे माजी सचिव अजय शिर्के यांचा गौप्यस्फोट

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

अनिल कुंबळे यांची भारतीय क्रिकेट संघाच्या मुख्य प्रशिक्षकपदावर निवड झाली, तेव्हा सुरुवातीपासूनच कर्णधार विराट कोहलीचा त्याला विरोध होता. मात्र क्रिकेट सल्लागार समितीने कुंबळे यांच्या नावावर शिक्कामोर्तब केल्यामुळे त्याचा स्वीकार करावा, अशा सूचना भारतीय क्रिकेट नियामक मंडळाकडून (बीसीसीआय) करण्यात आल्या. परंतु कुंबळे यांना एक वर्षांचा कार्यकाळ देण्यात आला, असा गौप्यस्फोट गुरुवारी बीसीसीआयचे माजी सचिव अजय शिर्के यांनी केला.

गेल्या वर्षी कुंबळे यांच्या प्रशिक्षकपदी निवड प्रक्रियेचा भाग असलेल्या शिर्के यांनी सांगितले की, ‘कुंबळे यांची निवड निश्चित झाली, त्याचवेळी या दोघांमधील तणावपूर्ण संबंधांची कुणकुण लागली होती. मात्र बीसीसीआयचे तत्कालीन अध्यक्ष अनुराग ठाकूर यांनी पुढाकार घेऊन दोघांशीही चर्चा केली. क्रिकेट सल्लागार समितीने प्रशिक्षकपदासाठी कुंबळे हाच सर्वोत्तम पर्याय आहे, असे स्पष्ट केल्यामुळे आपल्याला ते मान्य करायला हवे, अशी त्यांची धारणा होती. परंतु या परिस्थितीची जाणीव असल्यामुळे कुंबळे यांना एक वर्षांसाठीच करारबद्ध करण्यात आले, जेणेकरून आढावा घेऊन पर्याय खुला ठेवता येईल. कारण प्रशिक्षकपदाबाबत कोहलीचे मत वेगळे होते.’ सचिन तेंडुलकर, सौरव गांगुली आणि व्हीव्हीएस लक्ष्मण यांचा समावेश असलेल्या क्रिकेट सल्लागार समितीने रवी शास्त्रीपेक्षा कुंबळे यांना प्राधान्य दिले. शास्त्री यांनी दोन वष्रे भारतीय संघाचे संचालकपद सांभाळले होते.

मुख्य प्रशिक्षकपदासाठी आवश्यक असलेल्या पात्रतेची पूर्तता कुंबळे यांच्याकडून होत नव्हती. त्यामुळे प्राथमिक यादीतून निवडलेल्या प्रशिक्षकांमध्ये कुंबळे यांचे नाव असणे अपेक्षित नव्हते. परंतु क्रिकेट सल्लागार समितीने त्यांचे नाव त्यात टाकले. या प्रक्रियेआधी बीसीसीआयच्या सचिवपदावर माझी निवड झाल्यानंतर एके दिवशी कुंबळे यांनी माझ्याशी संपर्क साधून प्रशिक्षक होण्यासाठी आपण उत्सुक असल्याचे सांगितले. मात्र मी कुंबळे यांना प्रशिक्षकाची निवड शिफारशीनुसार होत नाही. त्यामुळे तुला प्रक्रियेतूनच जावे लागेल, असे स्पष्ट केले होते, असे शिर्के यांनी सांगितले.