Australia Won ICC Cricket World Cup 2023 against India : आयसीसी एकदिवसीय विश्वचषक २०२३ च्या अंतिम सामन्यात ऑस्ट्रेलियाने भारतीय संघाचा ६ गडी राखून पराभव करून विजेतेपदावर कब्जा केला. टीम इंडियाला तिसर्‍यांदा हे विजेतेपद मिळवण्यात अपयश आले असले, तरी सर्वच खेळाडूंनी संपूर्ण स्पर्धेत चमकदार कामगिरी केली. विशेषत: विराट कोहलीने स्पर्धेतील प्रत्येक सामन्यात संघासाठी महत्त्वाची खेळी खेळली. आता विराट कोहलीची विश्वचषक २०२३ च्या स्पर्धेतील सर्वोत्तम खेळाडू म्हणून निवड झाली आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

विराट कोहली स्पर्धेतील सर्वोत्तम खेळाडू ठरला –

विराट कोहलीने २०२३ च्या वर्ल्ड कपमध्ये सर्वाधिक धावा केल्या आहेत. विराटने स्पर्धेत ९५.६२ च्या सरासरीने सर्वाधिक ७६५ धावा केल्या आहेत, ज्यामध्ये त्याने ३ शानदार शतके आणि ६ अर्धशतकी झळकावली आहेत. संपूर्ण स्पर्धेत उत्कृष्ट कामगिरी केल्याबद्दल विराटला स्पर्धेतील सर्वोत्तम खेळाडू म्हणून निवडण्यात आले. अंतिम सामन्यातही विराट कोहलीने संघासाठी ५४ धावांची महत्त्वपूर्ण खेळी केली. पाण्याने भरलेल्या डोळ्यांनी ‘प्लेअर ऑफ द टूर्नामेंट’ची ट्रॉफी हातात घेतली.

ट्रॅव्हिस हेड ठरला सामनावीर –

अंतिम सामन्यात ट्रॅव्हिस हेडने भारताविरुद्ध १२० चेंडूत १३७ धावांची खेळी केली. या खेळीत त्याने १५ चौकार आणि ४ षटकार मारले.या सामन्यात ट्रॅव्हिस वेगळ्याच मूडमध्ये दिसत होता. तीन विकेट लवकर पडल्यानंतर हेडने डावाची धुरा सांभाळली आणि संघाला नेत्रदीपक विजय मिळवून दिला. हेडला त्याच्या शानदार खेळीसाठी सामनावीर म्हणून निवडण्यात आले.

विजेत्या आणि उपविजेत्याला बक्षीस म्हणून किती रक्कम मिळाली?

अंतिम फेरीतील विजेत्या आणि पराभूत संघाबद्दल बोलायचे, तर उपविजेत्या संघाला २० लाख डॉलर्स म्हणजेच १६.५८ कोटी रुपये मिळाले. त्याचबरोबर विजेत्या संघाला आयसीसीकडून ४० लाख डॉलर्सची बक्षीस म्हणजेच एकूण ३३.१७ कोटी रुपये मिळाले.

हेही वाचा – IND vs AUS Final: सलग १० विजयांवर एक पराभव पडला भारी, फायनलमध्ये भारताकडून निर्णय घेण्यात झाली का चूक?

मोहम्मद शमी ठरला स्पर्धेतील सर्वोत्त गोलंदाज ठरला –

भारतीय संघाचा वेगवान गोलंदाज मोहम्मद शमीने २०२३ च्या विश्वचषकात शानदार गोलंदाजी केली. अंतिम सामन्यात त्याला जास्त बळी घेता आले, नसले तरी या स्पर्धेत तो सर्वाधिक विकेट घेणारा गोलंदाज ठरला आहे. शमीने या विश्वचषकात केवळ ७ सामने खेळले आणि या सात सामन्यांमध्ये त्याने २४ विकेट्स घेतल्या. शमीला अंतिम सामन्यात केवळ एका विकेटवर समाधान मानावे लागले.

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Virat kohli became player of the tournament holding the trophy with moist eyes know who got which award world cup 2023 vbm
Show comments