Pakistan vs India Super 4 Asia Cup 2023: आशिया चषक २०२३ च्या सुपर ४ सामन्यात विराट कोहलीने पाकिस्तानविरुद्ध त्याच्या एकदिवसीय क्रिकेट कारकिर्दीतील ४७ वे शतक झळकावले. हे त्याचे पाकिस्तानविरुद्धचे वनडेतील तिसरे शतक ठरले. या शतकादरम्यान किंग कोहलीने एकदिवसीय फॉर्मेटमध्ये आपल्या १३,००० धावा पूर्ण केल्या आणि या फॉरमॅटमध्ये सर्वाधिक धावा करणारा सर्वात वेगवान फलंदाज बनला आणि सचिन तेंडुलकरचा विक्रमही मोडला.

विराट कोहलीने मोडला सचिनचा विक्रम –

विराट कोहलीने पाकिस्तानविरुद्धच्या या सामन्यात ८४ चेंडूत शतक पूर्ण केले आणि एकदिवसीय क्रिकेटमध्ये सर्वात जलद १३,००० धावा करणारा फलंदाज बनला. यापूर्वी हा विक्रम सचिन तेंडुलकरच्या नावावर होता, मात्र आता कोहलीने त्याच्याही पुढे गेला आहे. सचिनने ३२१ डावात तेरा हजार एकदिवसीय धावा केल्या होत्या, तर कोहलीने २६८ व्या डावात हा पराक्रम केला आहे.

वनडेमध्ये सर्वात जलद १३००० धावा करणारे फलंदाज –

विराट कोहली- २६७ डाव
सचिन तेंडुलकर- ३२१ डाव
रिकी पाँटिंग- ३४२ डाव

कोहलीने सर्वात जलद ७७ वे आंतरराष्ट्रीय शतक झळकावले –

सचिन तेंडुलकरने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वात जलद ७७ शतके झळकावण्यात यश मिळवले आणि सचिन तेंडुलकरला मागे टाकले. सचिनने ५९४ डावात ७७ शतके पूर्ण केली होती, तर कोहलीने ५६१ डावात हा पराक्रम केला आहे. कोहली एकदिवसीय क्रिकेटमध्ये सर्वात वेगवान ४७ शतके करणारा फलंदाज ठरला. त्याने सचिनचा विक्रमही मोडला. सचिनने आपल्या ४३५ व्या डावात ४७ वे एकदिवसीय शतक पूर्ण केले होते, तर कोहलीने २६७ व्या डावात हा पराक्रम केला.

कोहलीने केएल राहुलसोबत २०० हून अधिक धावांची केली भागीदारी –

या सामन्यात विराट कोहलीने केएल राहुलसोबत तिसऱ्या विकेटसाठी १९४ चेंडूत २३३ धावांची नाबाद भागीदारी केली. आशिया चषकात भारताची ही आतापर्यंतची सर्वोत्तम भागीदारी ठरली. या सामन्यात विराट कोहलीने ९४ चेंडूत ३ षटकार आणि ९ चौकारांच्या मदतीने नाबाद १२२ धावांची खेळी केली. विराट कोहलीने कोलंबोमध्ये चौथे शतक झळकावले. या सामन्यात केएल राहुलने ११ धावांची नाबाद खेळी खेळली. त्याचबरोबर भारताने पाकिस्तानविरुद्ध ५० षटकात २ बाद ३५६ धावा केल्या.

कोहलीने कोणत्याही ठिकाणी केलेली सर्वाधिक एकदिवसीय शतके –

कोलंबोमध्ये 4 शतके
मीरपूरमध्ये ४ शतके
त्रिनिदादमध्ये ३ शतके
विशाखापट्टणममध्ये ३ शतके

विराट कोहलीचे वनडेतील सर्वाधिक जलद धावांचे टप्पे –

८,000
९,000
१०,000
११,000
१२,000
१३,000

Story img Loader