विराट कोहली विश्रांतीनंतर पुनरागमन करत आहे. तो बांगलादेश विरुद्धच्या एकदिवसीय मालिकेत (IND vs BAN) भारतीय संघाचा भआग आहे. रविवारपासून सुरू होणाऱ्या या मालिकेपूर्वी विराट कोहलीने सोशल मीडियावर मोठी मजल मारली आहे. फेसबुकवर ५० दशलक्ष फॉलोअर्स असलेला तो भारतातील आणि जगातील पहिला क्रिकेटपटू ठरला आहे. विराट कोहली हा जगातील प्रत्येक मोठ्या प्लॅटफॉर्मवर सर्वाधिक फॉलो केलेला क्रिकेटर आहे.
विराट कोहली २०१९ पासून आऊट ऑफ फॉर्ममध्ये होता, त्यानंतर त्याच्या निवृत्तीच्या चर्चा होऊ लागल्या होत्या. माजी क्रिकेटपटूही त्याला काही काळ विश्रांती घेण्याचा सल्ला देत होते. अशात, विराटने आपला फॉर्म परत मिळवला. या वर्षाच्या सुरुवातीला खेळल्या गेलेल्या आशिया कपमध्ये त्याने पहिले टी-२० शतक झळकावले. त्याने टी-२० विश्वचषकातही चांगली खेळी केली.
विराट न्यूझीलंड दौऱ्यातून ब्रेक घेऊन पत्नीसह नैनितालला गेला होता. आता कोहली बांगलादेशविरुद्धच्या वनडे मालिकेतून पुनरागमन करत आहे. दरम्यान, त्याने सोशल मीडियावर एक मोठा टप्पा पार केला आहे. विराट फेसबुकवर ५० दशलक्ष फॉलोअर्सचा आकडा पार करणारा तो जगातील पहिला क्रिकेटपटू ठरला आहे.
विराट कोहलीने बुधवारी फेसबुकवर ५० मिलियन फॉलोअर्स पूर्ण केले. विराट कोहली सोशल मीडियावर खूप सक्रिय असतो, तो वेळोवेळी फोटो आणि व्हिडिओ शेअर करत असतो. आजकाल विराट त्याच्या चाहत्यांना सेल्फी/फोटो काढू देतो. विराट काही दिवसापूर्वी नैनितालमध्येच होता, तिथेही त्याने कोणतीही विशेष सुरक्षा ठेवली नाही. तसेच सर्व लोकांना फोटो, व्हिडिओ वगैरे काढण्याची परवानगी दिली होती.
इंस्टाग्रामवर विराट कोहलीचे २२५ मिलियन फॉलोअर्स आहेत. इंस्टाग्रामवर जगातील कोणताही क्रिकेटर फॉलोअर्सच्या बाबतीत त्याच्या जवळपासही नाही, तर विराट केवळ क्रिकेटर्सच नाही तर जगभरातील स्पोर्ट्स स्टार्सच्या बाबतीत टॉप ५ मध्ये येतो. विराट कोहली इंस्टाग्राम, ट्विटर आणि फेसबुकवर अधिक फॉलोअर्ससह आहे.