भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहलीने दिवसेंदिवस नवनवीन विक्रम आपल्या नावावर करण्याचा सपाटा चालु ठेवला आहे. आयसीसीच्या वन-डे क्रमवारीत ९०० रेटींग पॉईंटचा टप्पा गाठणारा विराट कोहली पहिला भारतीय खेळाडू ठरला आहे. गेल्या २७ वर्षांमध्ये कोणत्याही खेळाडूला ही किमया साधता आली नव्हती. कोहली सध्या ९०९ गुणांसह वन-डे क्रमवारीत पहिल्या स्थानावर आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

विराट कोहलीच्या आधी सर विव्हीअन रिचर्ड, झहीर अब्बास, ग्रेग चॅपल, डेव्हीड गोवर, डीन जोन्स आणि जावेद मियादाद यांनी आपल्या कारकिर्दीत ९०० रेटींग पॉईंटचा टप्पा गाठला होता. दक्षिण आफ्रिकेविरुद्ध ६ वन-डे सामन्यांच्या मालिकेत विराटने ५५८ धावांची लयलूट केली होती. कसोटी आणि वन-डे क्रिकेटमध्ये ९०० किंवा त्यापेक्षा जास्त रेटींग पॉईंटचा टप्पा गाठणारा विराट कोहली हा दुसरा खेळाडू ठरला आहे.

गोलंदाजीत अफगाणिस्तानचा राशिद खान आणि भारताचा जसप्रीत बुमराह ७८७ गुणांसह पहिल्या क्रमांकावर राहिले आहेत. झिम्बाब्वेविरुद्धच्या मालिकेत मालिकावीराचा किताब पटकावल्यानंतर राशिद खानच्या क्रमवारीत ८ स्थानांनी सुधारणा झालेली आहे. वन-डे क्रिकेटमधली फलंदाज आणि गोलंदाज यांची क्रमवारी पुढीलप्रमाणे –

आयसीसी वन-डे फलंदाज :

१) विराट कोहली – ९०९ गुण

२) एबी डिव्हीलियर्स – ८४४ गुण

३) डेव्हिड वॉर्नर – ८२३ गुण

४) बाबर आझम – ८१३ गुण

५) जो रुट – ८०८ गुण

६) रोहित शर्मा – ७९९ गुण

७) क्विंटन डी-कॉक – ७८३ गुण

८) फाफ डु प्लेसीस – ७८२ गुण

९) केन विलीयमसन – ७७७ गुण

१०) शिखर धवन – ७६९ गुण

 

आयसीसी वन-डे गोलंदाज :

१) राशिद खान/जसप्रीत बुमराह – ७८७ गुण

३) ट्रेंट बोल्ट – ७२९ गुण

४) जोश हेजलवूड – ७१४ गुण

५) हसन अली – ७११ गुण

६) इम्रान ताहीर – ६८३ गुण

७) कगिसो रबाडा – ६७९ गुण

८) युझवेंद्र चहल – ६६७ गुण

९) मिचेल सँटनर – ६६२ गुण

१०) मिचेल स्टार्क – ६५८ गुण

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Virat kohli become first indian batsman to cross 900 rating points in odi ranking