Babar Azam Resigns From Pakistan Captaincy Due to Virat Kohli: पाकिस्तानचा कर्णधार बाबर आझमने पुन्हा एकदा कर्णधारपद सोडण्याचा निर्णय घेतला आहे. बाबरने सोशल मीडियावर पोस्ट करून चाहत्यांना याची माहिती दिली. बाबरने टी-२० विश्वचषकापूर्वीच पुन्हा कर्णधारपदाची जबाबदारी स्वीकारली होती, पण आता पुन्हा एकदा माघार घेण्याचा निर्णय घेतला आहे. पाकिस्तानी मीडिया रिपोर्ट्सनुसार, बाबर आझमने विराट कोहलीमुळे कर्णधारपदाचा राजीनामा दिला असल्याचे म्हटले जात आहे.

बाबर आझमने विराट कोहलीमुळे कर्णधारपदाचा दिला राजीनामा

पाकिस्तानी न्यूज चॅनेल जियो न्यूजचा पत्रकार आरफा फिरोज जेक एक्सवर एक पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टमध्ये त्याने लिहिले, ‘इनसाईड स्टोरी- बाबर आझमच्या जवळच्या काही जणांनी बाबरला विराट कोहलीचे उदाहरण दिले आणि असही म्हणू शकतो की बाबरने कर्णधारपदाचा राजीनामा देत विराटच्या पावलावर पाऊल ठेवत पुढे जात आहे. बाबरला विराट कोहलीप्रमाणे वैयक्तिक कामगिरीवर लक्ष केंद्रित करायचे आहे.

हेही वाचा – Babar Azam: “आता वेळ आली आहे की…,” बाबर आझमने मध्यरात्री अचानक कर्णधारपदाचा दिला राजीनामा, वर्षभरात दुसऱ्यांदा सोडली कॅप्टन्सी

कोहलीप्रमाणेच बाबर आझमलाही वैयक्तिक कामगिरीवर लक्ष केंद्रित करायचे आहे, असे या पोस्टमध्ये पाकिस्तानी पत्रकाराने म्हटले आहे. विराट कोहलीने २०२१ मध्ये टीम इंडियाचे कर्णधारपद सोडले होते. बाबर आझमने कर्णधारपदाचा राजीनामा दिल्यानंतर चाहत्यांनी बाबरची खिल्ली उडवायला सुरुवात केली. अनेक मीम्सही व्हायरल झाले आहेत.

हेही वाचा – IND vs BAN: “भले आम्ही १०० वर ऑल आऊट झालो असतो पण…”, भारताच्या विजयानंतर रोहित शर्माचं मोठं विधान, नेमकं म्हणाला तरी काय?

बाबर आझम सध्या त्याच्या क्रिकेट कारकिर्दीतील वाईट टप्प्यातून जात आहे. टी-२० विश्वचषक २०२४ स्पर्धेत त्याने संघाला खूप निराश केले. या स्पर्धेत बाबर आझमच्या नेतृत्वाखालील पाकिस्तान संघाला अमेरिकेसारख्या कमकुवत संघाकडून पराभव स्वीकारावा लागला होता. संपूर्ण टी-२० विश्वचषकात बाबरची बॅट शांत होती. टी-२० विश्वचषकातील संघाती कामगिरी पाहता बाबर आझमच्या नेतृत्त्वावरही प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात होते. यानंतर बांगलादेशबरोबर नुकत्याच झालेल्या मायदेशातील कसोटी मालिकेतही बाबरची खराब कामगिरी पाहायला मिळाली. या मालिकेत बाबरच्या बॅटमधून एकही अर्धशतक पाहायला मिळाले नाही. त्यानंतर बाबरला सातत्याने ट्रोल केले जात होते.

हेही वाचा – IND vs BAN कसोटी मालिकेत २ बेस्ट फिल्डर, रोहित-सिराज-यशस्वी-राहुल; कोणाला मिळालं मेडल? पाहा VIDEO

बाबरने सोशल मीडियावर फोटो पोस्ट करत त्यातून कर्णधारपदाचा राजीनामा देत असल्याचे सांगितले आणि त्याला त्याच्या कामगिरीवर लक्ष केंद्रित करायचे आहे, असेही त्याने सांगितले.