Virat Kohli breaks Sachin Tendulkar’s record for most catches : भारतीय संघाने ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या पर्थ कसोटीत आपली पकड घट्ट केली आहे. टीम इंडियाने ऑस्ट्रेलियाला विजयासाठी ५३४ धावांचे लक्ष्य दिले होते, ज्याला प्रत्युत्तर देताना ऑस्ट्रेलियाने केवळ १२ धावांवर दोन विकेट गमावल्या. भारताकडून या सामन्यात विराट कोहली आणि यशस्वी जैस्वाल यांनी दमदार शतके झळकावली आहेत. बऱ्याच दिवसांनंतर कोहली आपल्या जुन्या लयीत दिसला आणि त्याने आपल्या फलंदाजीने सर्वांनाच खूश केले आहे. यासह त्याने क्षेत्ररक्षणातही योगदान देत सचिन तेंडुलकरचा मोठा विक्रम मोडला.

विराटने सचिन तेंडुलकर टाकले मागे –

उत्कृष्ट फलंदाजीनंतर विराट कोहलीने क्षेत्ररक्षणातही आपले कौशल्य दाखवून केवळ एक झेल घेऊन आश्चर्यकारक कामगिरी केली आहे. मोहम्मद सिराजच्या चेंडूवर त्याने पॅट कमिन्सचा झेल घेतला. यासह त्याने भारताकडून कसोटीत सर्वाधिक झेल घेण्याच्या बाबतीत सचिन तेंडुलकरला मागे टाकले आहे. विराटने कसोटीत ११६ तर सचिनने कसोटीत ११५ झेल घेतले आहेत. व्हीव्हीएस लक्ष्मण (१३५ झेल) आणि राहुल द्रविड (२०९ झेल) यांनी आता भारतासाठी कसोटी क्रिकेटमध्ये विराट कोहलीपेक्षा जास्त झेल घेतले आहेत. कोहलीची गणना जगातील सर्वोत्तम क्षेत्ररक्षकांमध्ये केली जाते आणि मैदानावरील त्याची चपळता दिसून येते.

Ranji Trophy Himanshu Sangwan Revealed Bus Driver Gives Surprise Advice To Dismiss Virat Kohli
Ranji Trophy: “विराटला बाद करायचंय तर चेंडू…”, बस ड्रायव्हरने दिला किंग कोहलीला बाद करण्याचा सल्ला, हिमांशू सांगवानचा मोठा खुलासा
mh370 search operation malaysian airlines
Malasian Airlines: बेपत्ता MH370 चा शोध; पुण्यातील प्रल्हाद…
Virat Kohli Gives Bats and Kit Bags as Gifts to Delhi Domestic Players on Ranji Trophy Return
Virat Kohli: विराट कोहलीने जिंकली सर्वांची मनं, दिल्लीच्या खेळाडूंना रणजीदरम्यान भेट दिल्या खास गोष्टी
Who Is Himanshu Sangwan He Clean Bowled Virat Kohli on Ranji Trophy Return
Ranji Trophy: विराट कोहलीला क्लीन बोल्ड करणारा हिमांशू सांगवान आहे तरी कोण? सेहवागचा आहे शेजारी
Virat Kohli Clean Bowled on Ranji Trophy Return
Virat Kohli Ranji Trophy: विराट कोहलीच्या पदरी रणजीतही निराशा! स्टंप्सच्या कोलांटउड्या, पाहा VIDEO
Ranji Trophy 2025 fan entered at Arun Jaitley Stadium ground to meet Virat Kohli during Delhi vs Railway match
Ranji Trophy 2025 : विराट कोहलीला भेटण्यासाठी चाहत्याने भेदला सुरक्षा रक्षकांचा घेरा, VIDEO होतोय व्हायरल
Virat Kohli returns to Ranji Trophy cricket sport news
कोहलीला सूर गवसणार? रणजी करंडकात आज १२ वर्षांनी
Virat Kohli Hugs Childhood Friend Shawez Khan During Ranji Trophy Practice
Virat Kohli: “बाबा…विराट कोहली खरंच तुमचा मित्र आहे?”, विराटने दिल्लीत बालपणीच्या मित्राला पाहताच मारली मिठी; मित्राचा लेक झाला चकित

ऑस्ट्रेलियात सर्वाधिक कसोटी शतके झळकावणारे भारतीय –

हेही वाचा – Virat Kohli : विराट कोहलीच्या षटकाराने सीमारेषेवरील सुरक्षारक्षक घायाळ, डोके धरून बसल्याचा VIDEO व्हायरल

u

विराटने डॉन ब्रॅडमनलाही टाकले मागे –

विराट कोहली आता ऑस्ट्रेलियात ऑस्ट्रेलियन संघाविरुद्ध आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक शतके झळकावणारा परदेशी खेळाडू ठरला आहे. कोहलीने जॅक हॉब्सचा ९ शतकांचा विक्रम मोडला. कोहलीच्या नावावर आता ऑस्ट्रेलियात कांगारू संघाविरुद्ध तिन्ही फॉरमॅटमध्ये १० शतके आहेत. इतकेच नाही तर कोहलीने सर्वाधिक कसोटी शतके झळकावण्याच्या बाबतीत महान ऑस्ट्रेलियन फलंदाज डॉन ब्रॅडमनलाही मागे टाकले आहे. ब्रॅडमनने २९ कसोटी शतके झळकावली होती तर कोहलीच्या नावावर आता ३० कसोटी शतके आहेत.

हेही वाचा – Sherfane Rutherford : १० षटकांच्या सामन्यातही शतक! शेरफन रुदरफोर्डची कमाल

u

दुसऱ्या डावात भारतीय फलंदाजांनी दाखवली आपली ताकद –

भारतीय संघाने ऑस्ट्रेलियाविरुद्ध दुसऱ्या डावात ६ बाद ४८७ धावा केल्यानंतर डाव घोषित केला. यशस्वी जैस्वाल, विराट कोहली आणि केएल राहुल यांनी टीम इंडियासाठी शानदार फलंदाजी केली. या खेळाडूंमुळेच टीम इंडिया मोठी धावसंख्या उभारण्यात यशस्वी ठरली. जैस्वालने १६१, कोहलीने नाबाद १०० आणि राहुलने ७७ धावा केल्या. पहिल्या डावाच्या आधारे टीम इंडियाकडे ४६ धावांची आघाडी होती. त्यामुळे त्याने ऑस्ट्रेलियाला ५३४ धावांचे लक्ष्य दिले आहे.

Story img Loader