एकदिवसीय मालिकेतून कर्णधारपद काढून घेण्यात आल्यानंतर विराट कोहलीने पहिल्यांदाच माध्यमांसमोर भूमिका मांडली आहे. बुधवारी पत्रकार परिषदेत विराटने सांगितले की, दक्षिण आफ्रिकेत वनडे मालिका खेळण्यासाठी आपण तयार आहोत आणि आतापर्यंत ज्या बातम्या पसरवल्या जात होत्या त्या पूर्णपणे चुकीच्या आहेत असे विराटने कोहलीने म्हटले आहे. यावेळी बोलताना रोहित शर्मासोबतच्या कर्णधारपदाच्या वादावर विराट कोहलीने मौन सोडले आहे.

“मला या निर्णयावर कोणतीही अडचण नाही. निवड समितीच्या बैठकीच्या दीड तास आधी माझ्याशी संपर्क करण्यात आला. मुख्य निवडकर्त्याने कसोटी संघाबाबत चर्चा केली. त्यानंतर मीटिंग संपण्यापूर्वी मला सांगण्यात आले की मी एकदिवसीय संघाचा कर्णधार होणार नाही आणि मला कोणतीही अडचण नाही. मात्र यापूर्वी कोणतीही माहिती देण्यात आली नव्हती,” असे विराट कोहलीने म्हटले आहे.

आठ डिसेंबर रोजी दक्षिण आफ्रिका दौऱ्यासाठी भारतीय कसोटी संघाच्या घोषणेसोबतच विराटकडून कर्णधारपद हिसकावून रोहित शर्माला नवा कर्णधार बनवण्याची घोषणाही करण्यात आली होती. तेव्हापासून बीसीसीआयच्या या निर्णयावरून वाद सुरू झाला होता. त्यानंतर विराट आणि रोहित शर्मामध्ये वाद सुरु असल्याच्या जोरदार चर्चा सुरु होत्या. त्यावर आता विराट कोहलीने प्रतिक्रिया दिली आहे.

“अफवांवर विश्वास ठेवू नका, मी एकदिवसीय मालिका…”, विराट कोहलीनं दिलं स्पष्टीकरण!

“माझ्या आणि रोहितमध्ये कोणतीही अडचण नाही. गेल्या अडीच  वर्षांपासून मी यावर स्पष्टीकरण देत आहे. या चर्चांमुळे मी आता थकलो आहे,” असे विराट कोहलीने म्हटले आहे.

विराट कोहली कर्णधारपदाबद्दल काय म्हणाला?

“कर्णधारपदावरून काढून टाकल्यानंतर माझ्या फलंदाजीवर फारसा परिणाम होणार नाही. जेव्हा मी भारतासाठी खेळतो तेव्हा मी माझे सर्वस्व देतो. जसे मी भारतासाठी एकदिवसीय सामन्यांमध्ये माझे योगदान देत असेन,” असे विराटने म्हटले.

मी टी २०चे कर्णधारपद सोडू नये असे बोर्डाने कधीच म्हटले नाही

टी-२० कर्णधारपद सोडण्यापूर्वी बोर्डाशी बोललो होतो, असे कोहलीने सांगितले. बोर्डानेही माझ्या म्हणण्याशी सहमती दर्शवली. मी टी-२० चे कर्णधारपद सोडू नये, असे बोर्डाने कधीच म्हटले नाही, असेही विराट म्हणाला. मला कसोटी आणि एकदिवसीय सामन्यांमध्ये कर्णधारपद हवे होते आणि माझी बोर्डाशी चर्चा सुरू आहे असे त्याने म्हटले होते. यापूर्वी बोर्डाचे अध्यक्ष सौरव गांगुली म्हणाले होते की, आम्ही कोहलीला टी २० च्या कर्णधारपदावरून पायउतार होण्यास रोखले होते.

सौरव गागुंलीचा ‘तो’ दावा विराटने फेटाळला; म्हणाला, BCCI ने मला..

दरम्यान, रोहित आणि विराट यांच्यातील भांडणाच्या वृत्तांदरम्यान बीसीसीआयच्या अधिकाऱ्यांची अनेक विधाने आली आहेत. या विधानांमुळे विराट कोहलीच्या वनडे मालिकेत खेळण्याबाबत संभ्रम निर्माण झाला होता. बीसीसीआयच्या एका सूत्राने यापूर्वी सांगितले होते की, विराट कोहली एकदिवसीय मालिकेत ब्रेक घेणार आहे. आणखी एका सूत्राने सांगितले की विराट कोहली एकदिवसीय मालिकेत खेळेल कारण त्याने अद्याप विश्रांतीसाठी अधिकृत अर्ज दिलेला नाही आणि तो होईपर्यंत तो मालिकेत खेळत आहे. दुखापत झाली तर वेगळी गोष्ट आहे.

Story img Loader