Virat Kohli Broke Chepauk Dressing Room Wall in Practice Session: भारतीय संघ सध्या बांगलादेशविरूद्धच्या दोन सामन्यांच्या कसोटी मालिकेतील पहिल्या सामन्यासाठी चेन्नईमध्ये दाखल झाला आहे. पहिला कसोटी सामना ९ सप्टेंबरपासून बांगलादेशविरुद्ध खेळवला जाणार आहे. चेन्नई येथे होणाऱ्या या सामन्यासाठी संपूर्ण भारतीय संघ जोमाने सराव करत आहे. या सरावादरम्यान विराट कोहलीने चेपॉक मैदानाची भिंत फोडली. चेपॉक स्टेडियमवर रविवारी झालेल्या सराव सत्रात विराटने असा फटका मारला की भिंतीला भगदाड पडले आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

कोहलीचा ‘विराट’ शॉट अन् चेंडू भिंतीच्या आरपार

विराट कोहली १५ तारखेला नेटमध्ये सराव करत होता. सराव करताना विराट काही कव्हर ड्राईव्ह मोठे फटके खेळताना दिसला. विराट गोलंदाजांसमोर आक्रमक क्रिकेट खेळत होता. यादरम्यान तो जबरदस्त फटकेबाजी करताना षटकार आणि चौकार एकामागून एक लगावत होता. या व्हिडीओमध्ये विराटने शानदार शॉट खेळला, ज्यामुळे ड्रेसिंग रूमजवळील भिंतीला छिद्र पडले. हा व्हिडिओ एका चाहत्याने शेअर केला आहे. विराट कोहलीने ड्रेसिंग रूमची भिंत तोडल्याचा हा व्हीडिओ चांगलाच व्हायरल झाला आहे.

हेही वाचा – Rohit Sharma: “रोहित तंत्रकुशल नाही, तो कठोर सरावही करत नाही”, जॉन्टी ऱ्होड्स रोहित शर्माबद्दल नेमकं काय म्हणाला? सचिनचा उल्लेख करत म्हणाला…

विराट कोहलीचे काही फोटोही सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहेत. या फोटोंमध्ये विराट त्याच्या चाहत्यांना ऑटोग्राफ देताना दिसत आहे. विराट बऱ्याच कालावधीनंतर या मालिकेतून कसोटीत पुनरागमन करणार आहे. त्याने जानेवारी २०२४ मध्ये दक्षिण आफ्रिकेविरुद्ध कसोटी मालिका खेळली होती. आता तो बांगलादेशविरुद्धच्या सामन्यातून कसोटी क्रिकेटमध्ये पुनरागमन करणार आहे. या मालिकेत विराटला अनेक मोठे विक्रम करण्याची संधी असेल.

हेही वाचा – माजी भारतीय क्रिकेटपटूची अवघ्या महिनाभरात केनिया संघाच्या मुख्य प्रशिक्षक पदावरून हकालपट्टी, अंतर्गत वादाचा फटका

दुसरीकडे, बांगलादेशच्या खेळाडूंमध्ये मोठा उत्साह आहे. पाकिस्तानविरूद्धच्या कसोटी मालिकेत बांगलादेशने प्रथमच कसोटी मालिका जिंकली, ज्याचा आनंद त्यांच्या अंतरिम सरकारने ३.२० कोटी बांगलादेशी टका रोख बक्षीसही जाहीर केली. बांगलादेशने आतापर्यंत भारतात एकही कसोटी मालिका जिंकलेली नाही आणि आपला चांगला फॉर्म कायम ठेवण्याची इच्छा आहे.

बांगलादेशने आतापर्यंत भारतात एकही कसोटी मालिका जिंकलेली नाही. बांगलादेशच्या संघात असे अनेक खेळाडू आहेत जे भारतासाठी अडचणी निर्माण करू शकतात. भारताने २०२४ च्या सुरुवातीला शेवटची कसोटी मालिका खेळली, ज्यामध्ये रोहित शर्माच्या संघाने घरच्या मैदानावर इंग्लंडचा ४-१ ने पराभव केला.

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Virat kohli breaks wall of chepauk dressing room during practice session in chennai ahead of ind vs ban test series watch video bdg