Virat Kohli Broke Sachin Tendulkar World Record IND vs NZ Test: भारत-न्यूझीलंड मुंबई कसोटीत विराट कोहली धावबाद झाला आणि संपूर्ण वानखेडे स्टेडियममध्ये भयाण शांतता पसरली. विराट कोहलीने चौकारासह खाते उघडले होते, त्यामुळे चाहते आनंद साजरा करत होते. पण पुढच्याच चेंडूवर तो धावबाद झाला आणि अवघ्या ४ धावा करत त्याला पॅव्हेलियनमध्ये परतावे लागले. विकेटच्यादरम्यान धावा काढण्यात विराट पटाईत आहे, पण यावेळी मात्र त्याच्या वेगावर मॅट हेन्रीच्या थ्रोने मात केली आणि भारताला मोठा धक्का बसला. पण ४ धावा करून बाद झाल्यानंतरही विराट कोहलीने मोठा विश्वविक्रम आपल्या नावे केला आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

विराट कोहली भलेही ४ धावा करून बाद झाला तरीही त्याने २ मोठे विक्रम आपल्या नावावर केले आहेत. खरंतर कोहली मैदानावर येताच त्याने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील ६०० डाव पूर्ण केले. अशाप्रकारे तो आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये ६०० डाव खेळणारा पहिला सक्रिय क्रिकेटपटू ठरला.

हेही वाचा – IND vs NZ: ९ चेंडूत ३ विकेट्स आणि टीम इंडियाची हाराकिरी, रोहित-विराटने पुन्हा केलं निराश

आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक डाव (इनिंग) खेळणारा सक्रिय क्रिकेटपटू

६०० – विराट कोहली<br>५१८ – मुशफिकर रहीम
५१८ – रोहित शर्मा<br>४९१ – शाकिब अल हसन
४७० – अँजेलो मॅथ्यूज

६०० आंतरराष्ट्रीय डाव खेळण्याचा विक्रम करणारा विराट कोहली हा केवळ तिसरा भारतीय क्रिकेटपटू आहे. याआधी केवळ सचिन तेंडुलकर आणि राहुल द्रविडने भारतासाठी ही मोठी कामगिरी केली आहे. एवढंच नाही तर हा टप्पा गाठणारा तो जगातील आठवा क्रिकेटपटू ठरला आहे.

हेही वाचा – IND vs PAK: पाकिस्तानने ५ षटकांत भारताचा केला पराभव, एकही विकेट न गमावता गाठले १२० धावांचे लक्ष्य

आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक डाव खेळणारा भारतीय क्रिकेटपटू

सचिन तेंडुलकर- 7७८२
राहुल द्रविड- ६०५
विराट कोहली- ६००
एमएस धोनी- ५२६
रोहित शर्मा- ५१८

विराट कोहली आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये ६०० डावांनंतर सर्वाधिक धावा करणारा फलंदाज बनला आहे. त्याने सचिन तेंडुलकरचा विश्वविक्रम मोडित काढला आहे. यापूर्वी ६०० डावात सर्वाधिक धावा करण्याचा विक्रम सचिनच्या नावावर होता. विराट कोहली ६०० डावांनंतर सर्वाधिक २७ हजार अधिक धावा करणारा पहिला क्रिकेटपटू ठरला आहे.

हेही वाचा – IND vs NZ: सर्फराझ खानमुळे वैतागलेल्या मिचेलने पंचांकडे केली तक्रार, रोहित शर्मा मात्र युवा खेळाडूच्या पाठीशी खंबीरपणे उभा, पाहा काय घडलं?

आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये ६०० डावांनंतर सर्वाधिक धावा करणारे फलंदाज

२७१३३ – विराट कोहली*
२६०२० – सचिन तेंडुलकर
२५३८६ – रिकी पाँटिंग
२५२१२ – जॅक कॅलिस
२४८८४ – कुमार संगकारा
२४०९७ – राहुल द्रविड
२१८१५ – महेला जयवर्धने
१९९१७ – सनथ जयसूर्या

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Virat kohli broke sachin tendulkar world record of most runs after first 600 innings in international cricket after suicidal run out ind vs nz mumbai test bdg