World Cup 2023, India vs Australia Match Updates: भारतीय संघाने विश्वचषक २०२३ मधील आपल्या मोहिमेची सुरुवात रविवारी ऑस्ट्रेलियाविरुद्ध केली. या सामन्यात गोलंदाजांच्या दमदार कामगिरीमुळे संपूर्ण कांगारू संघ १९९ धावांवर बाद झाला. प्रत्युत्तरात भारतीय संघाची सुरुवात खूपच खराब झाली आणि २ धावांवर तीन विकेट्स पडल्या होत्या. रोहित शर्मा, इशान किशन आणि श्रेयस अय्यर हे तिघेही खाते उघडू शकले नाहीत. यानंतर विराट कोहलीने केएल राहुलसोबत डावाची धुरा सांभाळली आणि शानदार खेळी केली. भारताने ४१.२ षटकांत ६ गडी राखून विजय मिळवला. या सामन्यात विराटने सचिन तेंडुलकरचा एक मोठा विक्रमही मोडला.
विराट कोहली आता मर्यादित षटकांच्या आयसीसी टूर्नामेंटमध्ये भारतासाठी सर्वाधिक धावा करणारा खेळाडू बनला आहे. यापूर्वी हा विक्रम सचिनच्या नावावर होता. पण आता विराटने एकदिवसीय विश्वचषक, टी-२० विश्वचषक आणि आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये सचिन तेंडुलकरपेक्षा जास्त धावा केल्या आहेत. या बाबतीत तो आता भारताचा नंबर १ फलंदाज बनला आहे.
आयसीसीच्या मर्यादित षटकांच्या स्पर्धेत सर्वाधिक धावा करणारे फलंदाज –
विराट कोहली- २७५९ धावा (६५वा )
सचिन तेंडुलकर- २७१९ धावा (५२ डाव)
रोहित शर्मा- २४२२ धावा (४६ डाव)
युवराज सिंग- १७०७ धावा (३४ डाव)
सौरव गांगुली- १६७१ धावा (६२ डाव)
एमएस धोनी- १४९२ धावा (३६ डाव)
राहुल द्रविड- १४८७ धावा (५५ डाव)
एकदिवसीय विश्वचषकाती सर्वाधिक पन्नास प्लस धावसंख्या करणारे फलंदाज –
२१ – सचिन तेंडुलकर
९ – रोहित शर्मा<br>९ – विराट कोहली<br>८ – युवराज सिंग
८ – राहुल द्रविड
८ – मोहम्मद अझरुद्दीन
कोहलीच्या वनडेमध्ये तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजी करताना ११,००० धावा पूर्ण –
ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या अर्धशतकी खेळीदरम्यान, त्याने वनडे फॉरमॅटमध्ये भारताकडून तिसऱ्या क्रमांकावर खेळताना ११,००० धावाही पूर्ण केल्या. वनडेमध्ये तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजी करताना ११,००० धावा करणारा तो भारताचा पहिला फलंदाज ठरला. एकदिवसीय क्रिकेटमध्ये विराट कोहलीने आतापर्यंत तिसऱ्या क्रमांकावर खेळल्या गेलेल्या २१५ सामन्यांच्या २१५ डावांमध्ये ११०१६ हून अधिक धावा केल्या आहेत.