Virat Kohli broke Virender Sehwag’s record for highest runs in Tests for India: भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यात डॉमिनिका येथे खेळल्या जात असलेल्या पहिल्या कसोटी सामन्यात रोहित आणि यशस्वी जैस्वाल यांनी शतके झळकावून विक्रमांची रांग लावली आहे. त्याचबरोबर चौथ्या क्रमांकावर फलंदाजीसाठी आलेल्या कोहलीनेही चांगली कामगिरी केली आहे. कोहलीने या सामन्यात २५वी धाव घेताच माजी क्रिकेटपटू वीरेंद्र सेहवागला मागे टाकले आहे. भारतासाठी कसोटीत सर्वाधिक धावा करणारा तो आता पाचवा भारतीय खेळाडू ठरला आहे.

सचिन तेंडुलकर हा भारतीय फलंदाजाकडून कसोटीत सर्वाधिक धावा करणारा खेळाडू आहे. त्याने २०० सामन्यांच्या ३२९ डावांमध्ये ५३.७८ च्या सरासरीने आणि ५४..०४ च्या स्ट्राईक रेटने १५,९२१ धावा केल्या आहेत. या यादीत राहुल द्रविड (१३,२६५ धावा) दुसऱ्या स्थानावर आहे. सुनील गावसकर (१०,१२२ धावा) तिसऱ्या, व्हीव्हीएस लक्ष्मण (८,७८१ धावा) चौथ्या क्रमांकावर आहेत. या यादीत वीरेंद्र सेहवाग ८,५०३ धावांसह पाचव्या स्थानावर होता पण कोहलीने आता त्याला मागे टाकत ८,५१५ धावा केल्या आहेत. यासह कोहली या दिग्गजांच्या क्लबमध्ये सामील झाला आहे.

IND vs BAN 3rd T20I Sanju Samson credited captain Suryakumar Yadav and coach Gautam Gambhir
IND vs BAN : ‘मी खूप वेळा अपयशी ठरलो आहे पण…’, शतकी खेळीनंतर संजू सॅमसनच्या प्रतिक्रियेने टीम इंडियासह चाहत्यांची जिंकली मनं
17th October Rashi Bhavishya In Marathi
१७ ऑक्टोबर पंचांग: धनसंपत्ती की प्रचंड यश, गुरुवारी…
Hardik Pandya No look shot video viral during India vs Bangladesh 1st T20 Match
Hardik Pandya : हार्दिक पंड्याच्या No Look शॉटने चाहत्यांना लावलं वेड, VIDEO होतोय तुफान व्हायरल
Morne Morkel Unhappy on Hardik Pandya Bowling
IND vs BAN : बांगलादेशविरुद्धच्या T20I मालिकेपूर्वी गोलंदाजी प्रशिक्षक मॉर्केल हार्दिकवर नाराज? जाणून घ्या कारण
IND vs BAN Rohit Sharma interacts with R Ashwin Daughters
IND vs BAN : विजयानंतर रोहित शर्माने पुन्हा एकदा जिंकली चाहत्यांची मनं, अश्विनच्या मुलींशी बोलतानाचा VIDEO व्हायरल
IND vs BAN 1st Test Mohammed sledging to Shanto
IND vs BAN सामन्यात गोंधळ! मोहम्मद सिराज बांगलादेशच्या कर्णधाराशी भिडला, बोट दाखवतानाचा VIDEO व्हायरल
Virat Kohli Naagin Dance Video Viral He Mocks Bangladesh with Snake Pose in IND vs BAN
VIDEO: विराट कोहलीचा फिल्डिंग करतानाचा नागिन डान्स व्हायरल, बांगलादेशला त्यांच्याच स्टाईलमध्ये चिडवलं?
IND vs BAN Shubman Gill fifth Test century against Bangladesh
IND vs BAN : शुबमनने शतक झळकावत भारताचा बाबर म्हणणाऱ्यांची बोलती केली बंद, भारताने बांगलादेशला दिले ५१५ धावांचे लक्ष्य

भारतासाठी कसोटीत सर्वाधिक धावा करणारे खेळाडू –

१. सचिन तेंडुलकर – १५९२१ धावा
२. राहुल द्रविड – १३२६५ धावा
३. सुनील गावस्कर – १०१२२ धावा
४. व्हीव्हीएस लक्ष्मण – ८७८१ धावा
५. विराट कोहली – ८५१५ धावा
६. वीरेंद्र सेहवाग – ८५०३ धावा

हेही वाचा – IND vs WI: रोहित-यशस्वी जोडीने मोडला २२ वर्षे जुना विक्रम, गावसकर आणि सेहवागला मागे टाकले

दुसऱ्या दिवस अखेर विराट कोहली आणि यशस्वी जैस्वाल नाबाद –

भारताने दुसऱ्या दिवसाचा खेळ संपला, तेव्हा दोन बाद ३१२ धावा केल्या आहेत. टीम इंडियाने पहिल्या डावात १६२ धावांची आघाडी मिळवली आहे. यशस्वी जैस्वालने पहिल्याच कसोटी सामन्यात शतक झळकावून आपल्या कारकिर्दीची शानदार सुरुवात केली. त्याने कर्णधार रोहित शर्माच्या साथीने टीम इंडियाला मजबूत स्थितीत आणले. रोहित १०४ धावा करून बाद झाला.

हेही वाचा – IND vs WI: यशस्वी जैस्वालचे शतक होताच ड्रेसिंग रूममध्ये एकच जल्लोष, कोहलीपासून द्रविडपर्यंत सर्वांनी केले अभिवादन, पाहा Video

तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजीला आलेला शुबमन गिल सहा धावा करून बाद झाला. यशस्वीने रोहितसोबत पहिल्या विकेटसाठी २२९ धावांची भागीदारी केली. तो १४३ धावांवर नाबाद आहे. त्याचवेळी माजी कर्णधार विराट कोहली ३६ धावा करून नाबाद आहे. वेस्ट इंडिजने नऊ गोलंदाजांचा वापर केला, पण त्यांना केवळ दोनच विकेट्स घेता आल्या. अॅलिक एथेनेझने रोहितला तर जोमेल वॅरिकनने शुबमन गिलला बाद केले.