भारतीय संघातील विराट कोहली या दिल्लीकर खेळाडूचे करिअर दुखापतींपासून दूर राहिले, तर कोहली क्रिकेट विश्वात आजवर केलेले सर्व विक्रम मोडीत काढेल आणि सचिन तेंडुलकरपेक्षाही उत्कृष्ट खेळाडू होण्याचा मान त्याला मिळेल असे मत भारतीय संघाचे माजी कर्णधार कपील देव यांनी केले आहे.
कोहलीची गेल्याकाही वर्षांपासूनची कामगिरी पाहता क्रिकेटरसिकांमध्ये याआधीपासूनच विराट मध्ये सचिनची उंची गाठण्याची कुवत असल्याची अटकळ सुरू आहे. याला दुजोरा देत यावेळी खुद्द कपील देव यांनीही विराट कोहली सचिनपेक्षाही चांगला खेळाडू होण्याची शक्यता वर्तविली.
कपील देव म्हणाले की, “क्रिकेटविश्वातील सर्वांचे विक्रम मोडीस काढेल यात काहीच शंका नाही. विराटची मी कोणाशीही तुलना करु इच्छित नाही. क्रिकेटमध्ये दुसरा डॉन ब्रॅडमन होणे नाही आणि दुसरा सचिनही होणे नाही. पण, हो विराटमध्ये उत्कृष्ट शैली आहे. त्याला अजून भरपूर क्रिकेट खेळायचे आहे तो नक्की सचिनपेक्षाही चांगला खेळाडू होऊ शकतो.”
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा