पाकिस्तानचा माजी दिग्गज गोलंदाज आकिब जावेदने एक धक्कादायक विधान केले आहे. आकिबने बाबर आझम आणि विराट कोहली यांची तुलना करताना मोठी प्रतिक्रिया दिली. ”स्विंग गोलंदाजीविरूद्ध तंत्र कसे असले पाहिजे हे बाबर आझमकडे पाहून विराट कोहली शिकू शकतो”, असे आकिबने म्हटले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

एका चर्चेदरम्यान, आकिब जावेदने दोन्ही फलंदाजांना महत्त्वपूर्ण सल्ला दिला. फिटनेसच्या बाबतीत त्याने बाबर आझमला विराट कोहलीकडून मार्गदर्शन घेण्याचा तर, विराट कोहलीला बाबरकडून त्याचा ऑफ स्टम्प गेम सुधारण्यासाठी शिकण्याचा सल्ला दिला.

आकिब जावेद म्हणाला, “बाबरपेक्षा विराट कोहलीकडे बरेच चांगले शॉट्स आहेत पण त्याचीही कमकुवत बाजू आहे. जर चेंडू स्विंग झाला, तर तो ऑफ स्टंपच्या भोवती अडकतो. इंग्लंडमधील जेम्स अँडरसनविरुद्ध विराटला हा प्रश्न उद्भवतो.”

आकिब जावेदने बाबर आझमची तुलना सचिन तेंडुलकरशीही केली आहे. तो म्हणाला, “जेव्हा तुम्ही बाबर आझमला पाहता तेव्हा त्याच्यात कोणतीही कमकुवत बाजू नसल्याचे आपण पाहतो, अगदी सचिन तेंडुलकरप्रमाणे. बाबर आझम तांत्रिकदृष्ट्या अधिक सुरक्षित आहे, पण जर त्याने विराट कोहलीसारखे तंदुरुस्तीकडे लक्ष दिले तर तो एक चांगला खेळाडू म्हणून तयार होईल.”

बाबर आझम आणि विराट कोहली यांच्यात बर्‍याचदा तुलना केली जाते. परंतु विराट कोहली माझ्यापेक्षा चांगला फलंदाज असल्याचे बाबरने याआधी म्हटले आहे.

बाबरचा विक्रम

बाबर आझमने आपल्या नावावर एक मोठा विक्रम केला आहे. टी-20 क्रिकेटमध्ये बाबरने 6000 धावा पूर्ण केल्या. दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या पहिल्या टी-20 सामन्यात बाबरने ही कामगिरी नोंदवली. टी-20 क्रिकेटमध्ये सर्वाधिक 6000 धावा करणारा बाबर हा जगातील दुसरा फलंदाज ठरला आहे. बाबरने 165 टी-20 डावात हा विक्रम नोंदवला. तर, कोहलीने आपल्या कारकीर्दीत 184 डावांमध्ये 6000 टी -20 धावा पूर्ण केल्या आहेत.

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Virat kohli can improve his technique by seeing babar azam says aaqib javed adn
Show comments