दक्षिण आफ्रिका दौऱ्यात स्वप्नवत कामगिरी करणाऱ्या विराट कोहलीचं सध्या सर्व स्तरातून कौतुक होताना दिसतोय. कसोटी, वन-डे आणि टी-२० मिळून विराटने आफ्रिका दौऱ्यात ८०० पेक्षा जास्त धावा काढल्या. भारतीय संघाचा माजी कर्णधार सौरव गांगुलीने विराटच्या खेळाचं कौतुक करत, भारतीय क्रिकेटला वरच्या पातळीवर नेण्याची क्षमता विराट कोहलीमध्ये असल्याचं म्हटलं आहे.
अवश्य वाचा – रवि शास्त्रींचा टीकाकारांवर हल्लाबोल
Cricketnext या संकेतस्थळाला दिलेल्या मुलाखतीत गांगुली म्हणाला, “सध्या विराट त्याच्या सर्वोत्तम फॉर्ममध्ये आहे. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सध्या एकही खेळाडू विराटच्या तोडीचा खेळ करत नाहीये. मी जेव्हा विराटला मैदानात पाहतो, तेव्हा त्याच्या खेळात मला एक सच्चेपणा जाणवतो. त्यामुळे येणाऱ्या काळात विराट भारतीय क्रिकेटला एका वेगळ्या उंचीवर नेऊन ठेवेल याची मला खात्री आहे.”
अवश्य वाचा – २००३ च्या विश्वचषकावेळी धोनी माझ्या संघात हवा होता – सौरव गांगुली
कर्णधार म्हणून धोनी आणि कोहली हे दोन वेगळे खेळाडू आहेत. विराट मैदानात आक्रमक असतो. प्रत्येक विकेट पडल्यानंतर किंवा शतक झाल्यानंतर त्याच्या सेलिब्रेशनची स्टाईलही मला आवडते. दुसरीकडे धोनीहा नेहमी शांत असतो. कर्णधार म्हणून मी कधीही त्याला दबावाखाली येताना पाहिलेलं नाही. मात्र विराट कधीकधी खडतर प्रसंगांमध्ये दबावाखाली येतो. त्यामुळे कर्णधार म्हणून दोघांची तुलना करणं योग्य ठरणार नाही. दोन्ही गुणवान खेळाडू भारताला लाभले हे भारतीय क्रिकेटचं सुदैव असल्याचंही गांगुलीने नमूद केलं.
अवश्य वाचा – …म्हणून धोनीच्या हेल्मेटवर तिरंगा नसतो