Rohit Sharma and Virat Kohli: भारताचा अनुभवी फिरकीपटू अमित मिश्रा नुकत्याच एका पोडकास्टसाठी गेला होता. अमित मिश्रा आणि भारताचे दिग्गज फलंदाज रोहित शर्मा आणि विराट कोहलीसह बराच काळ भारतीय संघातून क्रिकेट खेळला आहे. या पोडका्टमध्ये अमित मिश्राला हे दोन्ही खेळाडू पूर्वी कसे होते आणि कसे आहेत, याबद्दल विचारले असता त्याने विराचट आणि रोहितवर मोठे वक्तव्य केले आहे.
अनुभवी फिरकीपटू अमित मिश्राने कर्णधार झाल्यानंतर विराट कोहलीच्या वागणुकीत झालेल्या बदलावर मोठे खुलासे केले आहेत. २०१५ ते २०१७ दरम्यान कोहलीच्या नेतृत्वाखाली खेळलेल्या या अनुभवी कोहली आणि रोहितचा स्वभाव, त्याचं वागणंबोलणं कसं आहे याबद्दलही भाष्य केले. अमित मिश्राने कोहली आणि रोहित शर्मा यांच्यातील फरक सांगितला. कोहली आणि रोहित यांनी अवघ्या वर्षाच्या कालावधीतच टीम इंडियात पदार्पण केले होते.
रोहित शर्मासोबतचं त्याचं नात कसं आहे हे बोलताना अमित मिश्रा म्हणाला की, अमित आणि रोहितचं पहिल्यापासूनचं एक मैत्रीपूर्ण आणि खेळकर वागणं बोलणं राहिलं आहे. परंतु कोहलीच्या स्वभावातील बदलामुळे भारतीय संघात त्याचे कमी मित्र राहिले आहेत, असा खुलासाही मिश्राने केला आहे. यूट्यूब चॅनलवरील एका मुलाखतीदरम्यान, जेव्हा त्याला विचारले गेले की खेळाडूंमध्ये विराट कोहलीसाठी सचिन तेंडुलकर किंवा एमएस धोनीइतकाच आदर आहे का, तेव्हा तो स्पष्टपणे म्हणाला, ‘प्रत्येकजण खूप प्रामाणिक नसतो. मी खोटं बोलणार नाही. एक क्रिकेटर म्हणून मी त्याचा खूप आदर करतो, पण माझे त्याच्याशी असलेले नाते पूर्वीसारखे राहिलेले नाही.’
विराटचे फार कमी मित्र का आहेत? त्याचा आणि रोहितचा स्वभाव वेगळा आहे. मी तुम्हाला रोहितबद्दल सर्वात चांगली गोष्ट सांगेन. मी त्याला पहिल्या दिवशी जेव्हा भेटलो तेव्हा आणि आज जेव्हा भेटतो तेव्हा त्यात काहीच बदल झालेला नाही, तो पूर्वी होता तसाच आहे.
रोहितबद्दल सांगताना अमित मिश्रा म्हणाला, ‘मी अनेक वर्षांपासून भारतीय संघाचा भाग नाहीय. पण तरीही जेव्हा मी रोहितला आयपीएल किंवा इतर कोणत्याही कार्यक्रमात भेटतो तेव्हा तो नेहमी माझ्याशी मजा मस्करी करत असतो. तो काय विचार करेल याचा मला विचार करण्याची गरज लागत नाही. आम्ही एकमेकांची मस्करी करत असतो. तो सध्या यशाच्या शिखरावर आहे पण तरीही आम्ही तो बॉन्ड कायम ठेवला आहे. तो कर्णधार आहे, त्याने विश्वचषक आणि पाच आयपीएल विजेतेपदे जिंकली आहेत.
२००८ साली पदार्पण करणाऱ्या मिश्राने भारतासाठी २२ कसोटी सामने खेळले, त्यापैकी ९ सामने कोहलीच्या नेतृत्वाखाली खेळले आहेत. त्याचा शेवटचा कसोटी सामनाही विराटच्या नेतृत्वाखालीच खेळला होता. यादरम्यान मिश्राने ३३ विकेट घेतल्या, परंतु मिश्राने सांगितले की काळानुसार कोहलीशी त्याचं नातं इतकं बिघडल की त्यांच्यातील संवाद जवळजवळ बंद झाला.
हेही वाचा – Champions Trophy 2025: ‘भारतीय संघ पाकिस्तानात नाही आला तर…’, PCB ने BCCIला दिली धमकी?
विराटबद्दल सांगताना अमित मिश्रा म्हणाला, ‘मी विराटला बदलताना पाहिलय. आमचं बोलणं जवळपास बंद झालं. जेव्हा एखाद्याला प्रसिद्धी किंवा सत्ता मिळते तेव्हा तो विचार करू लागतो की त्याच्या या प्रवासात भेटलेली प्रत्येक व्यक्ती काहीतरी कारणासाठी आली होती. मी त्यांच्यापैकी कधीच नव्हतो. मी चिकूला तो १४ वर्षांचा असल्यापासून ओळखतो. जेव्हा तो समोसे खायचा, तेव्हा त्याला रोज रात्री पिझ्झा खायचा, पण चिकू आणि कर्णधार विराट कोहली यांच्यात खूप फरक आहे. जेव्हाही तो मला भेटतो तेव्हा तो मला खूप आदर दाखवतो, पण आता तो पूर्वीसारखा राहिलेला नाही.
© IE Online Media Services (P) Ltd