World Cup 2023 Team Of Tournament Australia: क्रिकेट ऑस्ट्रेलियाने २०२३ च्या विश्वचषकासाठी त्यांचा ‘बेस्ट संघ’ जाहीर केला आहे. यात विराट कोहलीला संघाचा कर्णधार म्हणून नियुक्त केले आहे. क्रिकेट ऑस्ट्रेलियेच्या वेबसाईटवर जाहीर केलेल्या १२ सदस्यीय संघात विराट कोहलीशिवाय आणखी तीन भारतीय खेळाडू – रवींद्र जडेजा, जसप्रीत बुमराह आणि मोहम्मद शमी यांना स्थान मिळाले आहे.तसेच दक्षिण आफ्रिका आणि ऑस्ट्रेलियाचे प्रत्येकी तीन आणि न्यूझीलंडचा एक खेळाडू या संघात आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

ऑस्ट्रेलियाच्या या प्लेइंग ११ संघात क्विंटन डी कॉक, जो २०२३ च्या विश्वचषकानंतर एकदिवसीय क्रिकेटमधून निवृत्त होणार आहे, त्याला व डेव्हिड वॉर्नरला सलामीवीर म्हणून नेमण्यात आले आहे. आपल्या पहिल्या विश्वचषकात नवे विक्रम रचणारा रचिन रवींद्र हा संघाचा तिसऱ्या क्रमांकाचा फलंदाज आहे, त्यानंतर विराट कोहली आणि एडन मार्कराम यांचा क्रमांक लागतो.

अफगाणिस्तानचे नाबाद २०१ धावांचे स्वप्न भंग करणाऱ्या ग्लेन मॅक्सवेलला गोलंदाजी अष्टपैलू मार्को जॅनसेन आणि जडेजा यांच्यासह संघाचा फिनिशर म्हणून नियुक्त करण्यात आले आहे. जसप्रीत बुमराह आणि मोहम्मद शमी यांची दोन वेगवान गोलंदाज म्हणून निवड करण्यात आली आहे. तर श्रीलंकेचा दिलशान मदुशंका १२वा (राखीव) खेळाडू आहे. खरंतर, मधुशंकाने शमी व बुमराह पेक्षा जास्त विकेट घेतल्या पण शमीचा स्ट्राइक रेट आणि बुमराहचा कमी धावा देण्याचा रेकॉर्ड यामुळे त्यांची निवड करण्यात आलेली आहे.

दरम्यान, हा संघ पाहून सोशल मीडियावर नेटकऱ्यांनी नाराजीचा सूर धरला आहे. रोहित शर्माला संघात न घेतल्याने अनेकांनी या निवडीवर टीका केली आहे. तुम्हाला या संघाविषयी काय वाटते हे कमेंट करून नक्की कळवा.

हे ही वाचा<< ६ बॉल्स, ६ विकेट्स! ऑस्ट्रेलियाच्या क्रिकेटरने एकाच षटकात सामना फिरवला; म्हणाला, “मला वेड..”, पाहा Video

एकदिवसीय विश्वचषक २०२३ साठी क्रिकेट ऑस्ट्रेलियाने निवडले बेस्ट इलेव्हन: क्विंटन डी कॉक, डेव्हिड वॉर्नर, रचिन रवींद्र, विराट कोहली (कर्णधार), एडन मार्कराम, ग्लेन मॅक्सवेल, मार्को जॅनसेन, रवींद्र जडेजा, मोहम्मद शमी, अॅडम झाम्पा, जसप्रीत बुमराह, दिलशान मदुशंका (राखीव) .

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Virat kohli chosen team australia captain shami bumrah jadeja in playing xi of best team in world cup 2023 rohit sharma fans angry svs