IND vs AUS 4th Test Match Updates:अहमदाबादमध्ये बॉर्डर गावस्कर ट्रॉफी २०२३ स्पर्धेतील चौथा सामना भारत आणि ऑस्ट्रेलिया संघात खेळला जात आहे. या सामन्यात विराट कोहलीने दीडशतक झळकावून कसोटी क्रिकेटमध्ये आपला शतकाचा दुष्काळ संपवला आहे. क्रिकेटच्या सर्वात लांब फॉरमॅटमध्ये कोहलीने १२०५ दिवसांनी शतक झळकावले. त्याचबरोबर त्याने या शतकाच्या जोरावर अनेक विक्रम आपल्या नावार केले आहेत. ज्यामध्ये सचिन तेंडुलकरचा एक विश्वविक्रम मोडल्याचा समावेश आहे.

चेंडूनुसार कसोटी क्रिकेटमधील कोहलीचे हे दुसरे संथ शतक आहे. त्याने ऑस्ट्रेलियाविरुद्ध २४१ चेंडूत हे शतक झळकावले. त्याचवेळी, किंग कोहलीने २८९ चेंडूंचा सामना करताना २०१२ मध्ये नागपूरमध्ये इंग्लंडविरुद्ध त्याच्या कारकिर्दीतील सर्वात संथ शतक ठोकले होते.

Travis Head Broke Rohit Sharma Record in ENG vs AUS ODI
ENG vs AUS: ट्रेव्हिस हेडने ‘बॅझबॉल’चा उडवला धुव्वा, विक्रमी खेळीसह मोडला रोहित शर्माचा वनडेमधील मोठा विक्रम
IND vs BAN old lady video viral after cheering Ashwin
IND vs BAN : अश्विनचा हुरुप वाढवायला आजी…
Ravichandran Ashwin Statement on Ravindra Jadeja and How he Hits Century with His help
Ravichandran Ashwin: “एक क्षण असा आला की मला…”, अश्विनने सांगितला मैदानातील संघर्ष; शतकाचं श्रेय जडेजाला देत म्हणाला…
IND vs BAN 1st Test Ravichandran Ashwin 6th century
IND vs BAN : रविचंद्रन अश्विनचे ऐतिहासिक शतक! ‘ही’ कामगिरी करणारा ठरला जगातील पहिला खेळाडू
Ravichandran Ashwin and Ravindra Jadeja Record Break 195 Runs Partnership for 7th Wicket
R Ashwin-Jadeja Partnership: अश्विन-जडेजाने वाचवला सन्मान, विक्रमी भागीदारीसह तोडले अनेक रेकॉर्ड, ठरली नंबर वन जोडी
IND vs BAN Ravichandran Ashwin scored a century against Bangladesh
IND vs BAN : अश्विनच्या झुंजार शतकी खेळीच्या जोरावर भारताने उभारला धावांचा डोंगर, बांगलादेशी गोलंदाजांची उडवली झोप
IND vs BAN Yashasvi Jaiswal broke George Headley's record
IND vs BAN : यशस्वी जैस्वालचा मोठा पराक्रम! जॉर्ज हेडलीचा ८९ वर्षांपूर्वीचा विक्रम मोडत लिहिला इतिहास
IND vs BAN Rohit Sharma praises Rishabh Pant
IND vs BAN : ऋषभ पंतने स्फोटक खेळीने जिंकले कर्णधाराचे मन, रोहित शर्मा कौतुक करतानाचा VIDEO व्हायरल
India vs Bangladesh Rohit Sharma Masterstroke in 1st Test Sending Rishabh Pant Ahead of KL Rahul
IND vs BAN: बांगलादेश कसोटीत रोहित शर्माचा मास्ट्ररस्ट्रोक, तीन विकेट्स गमावल्यानंतरही भारताने कसा सावरला डाव?

चेंडूंच्या बाबतीत कोहलीचे कसोटी क्रिकेटमधील सर्वात संथ शतक-

२८९ विरुद्ध इंग्लंड नागपूर, २०१२
२४१ विरुद्ध ऑस्ट्रेलिया अहमदाबाद, २०२३*
२१४ विरुद्ध ऑस्ट्रेलिया पर्थ, २०१८
१९९ विरुद्ध ऑस्ट्रेलिया अॅडलेड, २०१२
१९९ विरुद्ध ऑस्ट्रेलिया चेन्नई, २०१३

त्याचवेळी, कोहलीचे हे ऑस्ट्रेलियाविरुद्धचे आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील १६ वे शतक आहे. तसेच एका संघाविरुद्ध सर्वाधिक शतके झळकावणाऱ्या फलंदाजांच्या यादीत तो चौथ्या क्रमांकावर पोहोचला आहे. यामध्ये सचिन तेंडुलकरच्या नावावर ऑस्ट्रेलियाविरुद्ध सर्वाधिक २० शतके झळकावण्याचा विक्रम आहे.

एका संघाविरुद्ध सर्वाधिक कसोटी शतके झळकावणारे फलंदाज-

२० सचिन तेंडुलकर विरुद्ध ऑस्ट्रेलिया
१९ डॉन ब्रॅडमन विरुद्ध इंग्लंड
१७ सचिन तेंडुलकर विरुद्ध श्रीलंका
१६ विराट कोहली विरुद्ध ऑस्ट्रेलिया*
१६ विराट कोहली विरुद्ध श्रीलंका

सक्रिय खेळाडूंमध्ये सर्वाधिक शतके ठोकणाऱ्या फलंदाजांच्या यादीत कोहली खूप पुढे गेला आहे. जो रूट ४५ शतकांसह दुसऱ्या क्रमांकावर आहे. कोहली आता त्याच्यापेक्षा ३० शतकांनी पुढे आहे.

सक्रिय खेळाडूंमध्ये सर्वाधिक आंतरराष्ट्रीय शतके:

विराट कोहली – ७५*
जो रूट – ४५
डेव्हिड वॉर्नर – ४५
रोहित शर्मा – ४३
स्टीव्ह स्मिथ – ४२

विराट कोहलीने सचिन तेंडुलकरचा विश्वविक्रम मोडला –

विराट कोहलीच्या कसोटी कारकिर्दीतील हे ७५ वे शतक आहे. त्याने या टप्प्यावर पोहोचण्यासाठी सर्वात जलद शतक करण्याचा विश्वविक्रम केला आहे. कोहलीच्या आधी हा विक्रम क्रिकेटचा देव सचिन तेंडुलकरच्या नावावर होता. सचिनने ५६६ डावांत ७५ शतके पूर्ण केली, तर कोहलीने ५५२ डावांत हा पराक्रम केला.

कसोटी क्रिकेटमध्ये कोहलीचा हा सर्वात मोठा शतकाचा दुष्काळ आहे. २७व्या शतकानंतर त्याने २८वे शतक पूर्ण करण्यासाठी एकूण ४१ डाव घेतले. यापूर्वी त्याने ११वे ते १२वे शतक यादरम्यान ११ डाव घेतले होते. या शतकाने कोहलीने सुटकेचा नि:श्वास सोडला असेल.