भारताचा युवा फलंदाज विराट कोहलीने शुक्रवारी ट्विटरवर ५० लाख फॉलोअर्सचा टप्पा पार केला. नववर्षाच्या दुसऱ्या दिवशी ट्विटरवर विराटला फॉलो करणाऱ्यांची संख्या ५००४५४४वर पोहचली. ट्विटरवर सर्वाधिक फॉलो करण्यात येणाऱ्या क्रिकेट खेळाडुंच्या पंक्तीत विराट कोहलीला स्थान मिळाल्यानंतर त्याने आपल्या चाहत्यांचे आभार मानले. फॉलोअर्सच्याबाबतीत विराटने मास्टर-ब्लास्टर सचिन तेंडुलकरलाही मागे टाकले आहे. सध्या ट्विटरवर सचिनचे ४९,१०,४९८ फॉलोअर्स आहेत. गेल्या तीन महिन्यांत विराट कोहलीच्या ट्विटरवरील लोकप्रियतेत प्रचंड वाढ झाल्याचे दिसून आले आहे. अवघ्या तीन महिन्यांमध्ये त्याच्या फॉलोअर्सच्या संख्येत १० लाखांची भर पडली आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा